230च्या स्पीडने BMW पळवली; FB LIVEवर म्हणाले- 'चौघेही मरतील', काही वेळातच मेले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 08:02 PM2022-10-15T20:02:36+5:302022-10-15T20:04:15+5:30

JDU नेत्याच्या मुलासह चौघांचे तुकडे-तुकडे झाले, मृतदेह पोत्यात भरुन नेले. पाहा धक्कादायक LIVE व्हिडिओ...

bihar accident | BMW at speed of 230 kmph, said on FB LIVE- 'All four will die', died within a short time | 230च्या स्पीडने BMW पळवली; FB LIVEवर म्हणाले- 'चौघेही मरतील', काही वेळातच मेले...

230च्या स्पीडने BMW पळवली; FB LIVEवर म्हणाले- 'चौघेही मरतील', काही वेळातच मेले...

googlenewsNext

पाटणा: जिभेवर कधीही वाईट शब्द आणू नका, असे म्हटले जाते. कारण वाईट बोलल्याने कधी-कधी ती गोष्ट तुमच्यासोबत घडू शकते. बिहारमधील डॉक्टर आणि जेडीयू नेत्याचा मुलगा आणि त्याच्या साथीदारांसोबत अशीच घटना घडली आहे. ते पूर्वांचल द्रुतगती मार्गावर ताशी 230 किमी वेगाने त्यांची BMW कार पळवत होते. गाडी पळवण्याचा लाईव्ह व्हिडिओही त्यांनी फेसबुकवर शेअर केला. 

गाडीतील चौघांचा मृत्यू
लाईव्ह व्हिडिओमध्ये गाडीतील एक व्यक्ती म्हणतो, 'स्पीड वाढव. चौघेही मरतील.' काही वेळात तेच घडलं आणि भरधाव कार कंटेनरला धडकली. या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. यूपीच्या सुलतानपूर येथील पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या अपघातात डॉ. आनंद कुमार (रा.देहरी) यांचा मृत्यू झाला. त्यांचे वडील निर्मल कुमार हेदेखील डॉक्टर तसेच जेडीयू नेते आणि औरंगाबाद लोकसभेचे प्रभारी आहेत.

गाडीचा चक्काचूर झाला
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, डॉ. आनंद कुमार शुक्रवारी सकाळी डेहरीहून उत्तर प्रदेशातील फैजाबादला रवाना झाले होते. त्यांचे मोठे काका, माजी प्रमुख हिरालाल सिंह यांचे जावई दीपक कुमार, मित्र अखिलेश सिंह आणि भोला कुशवाह त्यांच्या बीएमडब्ल्यू कारमध्ये सोबत होते. पूर्वांचल द्रुतगती मार्गावर सुलतानपूरजवळ कंटेनरची धडक बसल्याने बीएमडब्ल्यू कारचा चक्काचूर झाला. यात आनंद कुमार यांच्यासह चौघांचा जागीच मृत्यू झाला.

फेसबुक लाईव्हवर गाडीचा वेग दाखवला
आनंद कुमार आणि त्याचे साथीदार बीएमडब्ल्यू कारमध्ये होते. यावेळी गाडीतील दीपक कुमारने फेसबुक पेजवर लाइव्ह व्हिडिओ सुरू केला आणि यामध्ये कारचा वेग दाखवला. गाडी चालवणारा व्यक्ती हळुहळू वेग वाढवत होता आणि एक पॉइंटवर गाडीचा वेग तासी 230 पर्यंत पोहोचला. यानंतर काही वेळातच त्यांची कार कंटेनरला धडकली. वेग जास्त असल्याने कारचा पूर्ण चक्काचूर झाला. बीएमडब्ल्यू कंटेनरमध्ये शिरली. कारमधील सर्व प्रवाशांचे मृतदेह छिन्नविछिन्न झाले होते. मृतदेहाचे तुकडे पोत्यात भरून न्यावे लागले. 

Web Title: bihar accident | BMW at speed of 230 kmph, said on FB LIVE- 'All four will die', died within a short time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.