Bihar Assembly Election 2020: डाव्या पक्षांचीही कामगिरी नेत्रदीपक; २९ पैकी १८ जागांवर आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 01:02 AM2020-11-11T01:02:52+5:302020-11-11T07:02:27+5:30

डावे पक्ष लढवत असलेल्या २९ जागांपैकी १८ जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत.

Bihar Assembly Election 2020: The performance of the Left parties is also spectacular | Bihar Assembly Election 2020: डाव्या पक्षांचीही कामगिरी नेत्रदीपक; २९ पैकी १८ जागांवर आघाडी

Bihar Assembly Election 2020: डाव्या पक्षांचीही कामगिरी नेत्रदीपक; २९ पैकी १८ जागांवर आघाडी

Next

विचारसरणीच्या पक्षांचा खूप दबदबा होता. परंतु काही प्रदेशांचा अपवाद वगळता संपूर्ण देशभरातच डाव्या पक्षांना ओहोटी लागल्याची स्थिती पाहायला मिळाली. बिहारही याला अपवाद नव्हता. परंतु या निवडणुकीत डाव्या पक्षांना एका अर्थाने नवसंजीवनी मिळाली, असे म्हणावे लागेल. राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेससोबत महाआघाडीच्या घटक असलेल्या डाव्या पक्षांनी या खेपेला दोन आकडी झेप घेतली आहे. डावे पक्ष लढवत असलेल्या २९ जागांपैकी १८ जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत.

महाआघाडीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी डावे) या तिन्ही पक्षांच्या उमेदवारांचा समावेश आहे. अगिआव, अराह, अरवाल, बलरामपूर, बिभुतीपूर, दाराउली, दराऊंधा, दुमराव, घोसी, करकट, मांझी, मथिहानी, पालीगंज, तरारी, वारिसनगर, झिरादेई, बचवारा तसेच बखरी आदी जागांवर हे उमेदवार नशीब आजमावत आहेत.
मागील दोन विधानसभा निवडणुकांमध्ये डाव्या पक्षांच्या आमदारांमध्ये लक्षणीयरित्या घट झालेली दिसून आली.

२०१० मध्ये माक्सर्वादी पार्टी ऑफ इंडियाला तिथे केवळ एकच जागा जिंकता आली. तर २०१५ मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) या पक्षाने एक जागा जिंकली होती. तेव्हा इतर दोन्ही डाव्या पक्षांना भोपळाही फोडता आला नव्हता. परंतु या खेपेस डाव्या पक्षांनी विद्यमान सरकारच्या आर्थिक धोरणाविरोधात जोरदार प्रचार केला. बेरोजगारी आणि श्रीमंत-गरीब यांच्यातील वाढत चाललेली दरी आदी मुद्दे त्यांनी जनतेसमोर जोरकसपणे मांडले. या‌वेळी एक्जिट पोलमध्येही डाव्या पक्षांना १२ ते १६ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता.

Web Title: Bihar Assembly Election 2020: The performance of the Left parties is also spectacular

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.