Bihar Assembly Election 2020: बिहारच्या मुख्यमंत्रिपदी तेजस्वी की नितीशकुमार?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 01:58 AM2020-11-10T01:58:26+5:302020-11-10T07:00:03+5:30
सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरु होईल.
Next
पाटणा : तमाम मतदानोत्तर जनमत चाचण्यांनी राष्ट्रीय जनता दलाचे युवा नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला दिलेले झुकते माप आणि तरुणांमध्ये तेजस्वी यांच्याविषयी असलेेले आकर्षण या पार्श्वभूमीवर बिहारच्या मुख्यमंत्रिपदी तेजस्वी यांना पसंती दिली जाते की, मतदार नितीशकुमार यांना चौथ्यांदा संधी देतात, याचा फैसला आज, मंगळवारी होईल. बिहारमधील निकालांबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरु होईल.