Bihar Assembly Election Result : जेडीयूने निकालांपूर्वीच मानली हार, प्रवक्ते के.त्यागी यांनी केले धक्कादायक विधान
By बाळकृष्ण परब | Updated: November 10, 2020 11:14 IST2020-11-10T11:13:39+5:302020-11-10T11:14:43+5:30
Bihar Assembly Election Result News : बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये सत्ताधारी एनडीए आणि विरोधी पक्ष असलेल्या महाआाडीमध्ये अटीतटीची लढत सुरू आहे.

Bihar Assembly Election Result : जेडीयूने निकालांपूर्वीच मानली हार, प्रवक्ते के.त्यागी यांनी केले धक्कादायक विधान
पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये सत्ताधारी एनडीए आणि विरोधी पक्ष असलेल्या महाआाडीमध्ये अटीतटीची लढत सुरू आहे. सध्या आलेल्या कलांमध्ये एनडीएला माफक आघाडी आहे. मात्र सुरुवातीच्या कलांनंतर सत्ताधारी जेडीयूचे प्रवक्ते के.सी. त्यागी यांनी धक्कादायक विधान केले आहे. सुरुवातीचे कल पाहून के. सी. त्यागी म्हणाले की, आम्हाला तेजस्वी यादव यांनी नव्हे तर गेल्या काही काळात आलेल्या नैसर्गिक आपत्तींनी पराभूत केले आहे.
एनडीटीव्हीशी संवाद साधताना के. सी. त्यागी म्हणाले की, आम्हाला नैसर्गिक आपत्तीने पराभूत केले आहे. बिहारमधून ब्रँड नितीश पराभूत झालेला नाही. तसेच तेजस्वी यादवही राजकारणात स्थापन झालेले नाही. आम्ही जनमताच्या कौलाचे स्वागत करतो. आम्ही राष्ट्रीय आपत्तीकडून पराभूत झालो आहोत. आमच्या आरजेडी किंवा तेजस्वी यादवांकडून पराभव झालेला नाही.
दरम्यान, सध्याच्या आकडेवारीनुसार नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए १२५ जागांवर आघाडीवर आहे. तर आरजेडी ११० जागांवर आघाडीवर आहे. तर इतर पक्ष १७ जागांवर आघाडीवर आहेत. दरम्यान, कोविड-१९ च्या नियमांमुळे मतमोजणी संथगतीने सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीचा कल स्पष्ट होण्यासाठी संध्याकाळ होण्याची शक्यता आहे.