Bihar Assembly Election Results: सीमांचलमध्ये ओवेसी फॅक्टरनं बदललं महाआघाडीचं गणित; बिहारमध्ये 'Non-बिहारी पार्टी'ची एन्ट्री!
By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 10, 2020 04:04 PM2020-11-10T16:04:20+5:302020-11-10T16:09:09+5:30
येत असलेल्या निवडणूक निकालांचा विचार करता, येथे केवळ एनडीए आणि महाआघाडी यांच्यातच लढाई बघायला मिळत आहे. मात्र...
पाटणा - नेपाळ आणि पश्चिम बंगालच्या सीमेला लागून इशांन्य भारताला जोडल्या जाणाऱ्या भागाला बिहारमधील सीमांचल भाग म्हणून ओळखले जाते. राजकारणाच्या दृष्टीने हा भाग अत्यंत महत्वाचा मानला जातो. कारण येथील पूर्णियामध्ये 35 टक्के, कटिहारमध्ये 45 टक्के, अररियामध्ये 51 टक्के आणि किशनगंजमध्ये 70 टक्के मुस्लीम मतदार आहेत. आता जे निवडणूक निकाल समोर येत आहेत, त्यानुसार सीमांचल मधील 24 जागांवर असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएमने महाआघाडीचे संपूर्ण गणितच बिघडवले आहे. परिणामी येथील या 24 जागांपैकी महा आघाडी केवळ 5 तर एनडीए 11 जागांवर पुढे आहे. तर 8 जागा इतरांना मिळत आहेत. यात ओवेसी यांचा एआयएमआयएम पक्ष तीन जागांवर पुढे आहे.
येत असलेल्या निवडणूक निकालांचा विचार करता, येथे केवळ एनडीए आणि महाआघाडी यांच्यातच लढाई बघायला मिळत आहे. मात्र या निवडणुकीत ओवेसी फॅक्टर एनडीएच्या फायद्याचा ठरत आहे. ओवेसींचा पक्षही महाआघाडी आणि आणि एनडीएला आव्हान देत आहे. गत विधानसभा निवडणुकीचा विचार करता, सीमांचलमधील 19 पैकी 12 जागा आरजेडी आणि काँग्रेसने जिंकल्या होत्या.
Bihar Assembly Election Results : बिहारमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष, NDA बहुमताच्या पुढे
या तीन जागांवर एआयएमआयएम आघाडीवर -
सध्या ओवेसी यांचा पक्ष एआयएमआयएम अमौर, बहादुरगंज आणि कोचाधामन या तीन जागांवर पुढे आहे. सीमांचलमधील 24 जागांवर, महाआघाडीकडून आरजेडी 11, काँग्रेस 11, भाकपा-माले 1 आणि सीपीएम एका जागेवर निवडणूक लढवत आहेत. तर, एनडीएकडून भाजपा 12, जेडीयू 11 तर हम एका जागेवर नशीब आजमावत आहेत.
सीमांचल भागात 2015च्या निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. येथे एकट्या काँग्रेसने 9 जागांवर विजय मिळवला होता. तर जेडीयूने 6 आणि आरजेडीने 3 जागा जिंकल्या होत्या.
मोदींचा करिष्मा संपला, नितीश कुमारांना भाजपच्या 'या' रणनीतीचा फटका बसला; भुजबळांचा मोठा दावा
कोरोना काळातील ही देशातील पहिलीच निवडणूक आहे. हिंदी बेल्टमधील निवडणुकीच्या दृष्टीने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर बिहारमधील निवडणूक तिसऱ्या क्रमांकाची सर्वात महत्वाची निवडणूक मानली जाते.