Bihar Assembly Election Results : गिरिराज सिंहांनी मीम शेअर करत तेजस्वी यादवांना केले 'रन आउट'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 10:24 AM2020-11-11T10:24:34+5:302020-11-11T10:29:47+5:30
Giriraj Singh : बिहारमध्ये भाजपा आणि नितीश कुमार यांच्या एनडीएला बहुमत मिळणार नाही, असे एक्झिट पोलचे अंदाज मतदारांनी धुळीस मिळविले आणि या एनडीएलाच सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत.
पटना : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आता सर्वांसमोर आले आहेत. बिहारमध्ये भाजपा आणि नितीश कुमार यांच्या एनडीएला बहुमत मिळणार नाही, असे एक्झिट पोलचे अंदाज मतदारांनी धुळीस मिळविले आणि या एनडीएलाच सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. मंगळवारी रात्री एनडीएने 122 बहुमताचा जादूई आकडा पार करताच एकच उत्सवाचे वातावरण झाले.
या निवडणुकीत भाजपा एनडीएमधील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. त्यामुळे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून भाजपाच्या विजयाबद्दल आणि आरजेडीच्या पराभवाबद्दल मीम शेअर केले आहे. गिरीराज सिंह यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीशकुमार आणि तेजस्वी यादव क्रिकेट खेळताना दिसत आहेत. त्यामध्ये तेजस्वी यादव धावचीत होताना दिसत आहे. तसेच, गिरीराज सिंह यांनी ट्विट करताना या फोटोसाठी 'गुड वन' असे शीर्षक दिले आहे आहे.
Good one . pic.twitter.com/7RYgSlveWs
— Shandilya Giriraj Singh (@girirajsinghbjp) November 10, 2020
दरम्यान, बिहारमध्ये मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली, ती रात्री उशिरापर्यंत सुरु होती. काल रात्री एनडीएने बहुमताचा आकडा ओलांडला आणि बिहारच्या लोकांनी एनडीएला पुन्हा एकदा राज्याची सत्ता सांभाळण्याची संधी दिली. पण भाजपाला संयुक्त जनता दलापेक्षा अधिक जागा मिळाल्याने नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील का, हा प्रश्न आहे.
नितीशकुमार यांनी भाजपा मुख्यमंत्रीपद देणार का?
शिवसेनेपाठोपाठ अकाली दलानेही भाजपाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संयुक्त जनता दल भाजपाचा सर्वात मोठा सहकारी पक्ष म्हणून समोर आला. मात्र आपल्याहून कमी जागा जिंकणाऱ्या नीतिशकुमार यांना मुख्यमंत्री बनवण्याची भूमिका भाजपाने कायम ठेवली, तरच एनडीएचे अस्तित्त्व टिकेल. २०१४ साली लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा महाराष्ट्रात शिवसेना व भाजपाने स्वतंत्र निवडणूक लढवली. पण नंतर शिवसेना-भाजपा युती सरकार झाले. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत युती कायम राहिली. मात्र मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्ष एकमेकांपासून दूर गेले. जदयूनेही पंतप्रधान मोदी यांना विरोध करून एनडीएला काही काळ सोडचिठ्ठी दिली होती.