Bihar Assembly Election Results : पंतप्रधान मोदींविरोधात उद्धटपणे बोलू नका, तेजस्वी यादव यांचा RJD नेत्यांना इशारा

By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 10, 2020 09:44 AM2020-11-10T09:44:05+5:302020-11-10T09:47:15+5:30

तेजस्वी यादव यांनी त्यांच्या घराबाहेर जमलेल्या नेत्यांना, मतमोजणी सुरू होण्यापूर्वी बोलावले आणि निवडणुकीचा निकाल काहीही आला, तरी कुणीही पंतप्रधान मोदींविरोधात वाईट उद्गार काढणार नाही, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. ते म्हणाले...

Bihar Assembly Election Results tejashwi yadav adviced leaders not to say anything rubbish about pm modi | Bihar Assembly Election Results : पंतप्रधान मोदींविरोधात उद्धटपणे बोलू नका, तेजस्वी यादव यांचा RJD नेत्यांना इशारा

Bihar Assembly Election Results : पंतप्रधान मोदींविरोधात उद्धटपणे बोलू नका, तेजस्वी यादव यांचा RJD नेत्यांना इशारा

googlenewsNext
ठळक मुद्देएक्झिट पोलचा विचार करता तेजस्वी यादव यांच्याकडे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिले जात आहे. पंतप्रधान मोदींविरोधात उद्धटपणे बोलू नये, असे स्पष्ट निर्देश तेजस्वी यादव यांनी आपल्या नेत्यांना दिले आहेत.तेजस्वी यादव हे निवडणुकीदरम्यान नितीश कुमार यांच्या विरोधात जेवढे आक्रमक वाटत होते, ते तेवढेच एक्झिटपोलच्या अंदाजानंतर परिपक्व वाटू लागले आहेत.


नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly Election Results) मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यावेळी बिहारची धुरा जनतेने नेमकी कुणाच्या हाती दिली हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. एक्झिट पोलचा विचार करता तेजस्वी यादव यांच्याकडे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिले जात आहे. मात्र, मतमोजणीच्या काही वेळ आधीच, पंतप्रधान मोदींविरोधात उद्धटपणे बोलू नये, असे स्पष्ट निर्देश तेजस्वी यादव यांनी आपल्या नेत्यांना दिले आहेत.

तेजस्वी यादव यांनी त्यांच्या घराबाहेर जमलेल्या नेत्यांना, मतमोजणी सुरू होण्यापूर्वी बोलावले आणि निवडणुकीचा निकाल काहीही आला, तरी कुणीही पंतप्रधान मोदींविरोधात वाईट उद्गार काढणार नाही, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. ते म्हणाले, अनेक नेते कॅमेऱ्यासमोर पंतप्रधान मोदींविरोध बोलत आहेत, हे योग्य नाही. आता, अशा प्रकारची वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांवर कारवाईही केली जाऊ शकते, असा इशाराही तेज्वी यांनी यावेळी दिला आहे.

Bihar Assembly Election Result : बिहारमध्ये तेजस्वी लाट? पोस्टल बॅलेटच्या मोजणीत महाआघाडीला मोठी आघाडी

तेजस्वी यादव हे निवडणुकीदरम्यान नितीश कुमार यांच्या विरोधात जेवढे आक्रमक वाटत होते, ते तेवढेच एक्झिटपोलच्या अंदाजानंतर परिपक्व वाटू लागले आहेत. तेजस्वी यांनी कालच आपल्या नेत्यांना संदेशही दिला, की निवडणुकीचा निकाल भलेही काही लागो, पण कुणीही कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन करणार नाही.

यावेळी, निवडणुकीत आपला विजय झाला तरीही कुणी आतिशबाजी करणार नाही अथवा आपला पराभव झाला तरीही कुणी रस्त्यावर येऊन हुल्लडबाजी करणार नाही, असे निर्देशही तेजस्वी यांनी आपल्या नेत्यांना दिले आहेत.

Bihar Assembly Election Results : "महाआघाडीला पचणार नाही एक्झिट पोलच्या विजयाचा लाडू, एनडीएचे सरकार बनणार"

Web Title: Bihar Assembly Election Results tejashwi yadav adviced leaders not to say anything rubbish about pm modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.