बिहार विधानसभा निवडणूक नियोजित वेळेत होणार -अरोरा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 01:40 AM2020-08-12T01:40:11+5:302020-08-12T01:40:51+5:30
निवडणुकीत सत्ताधारी जेडीएस-भाजपा, काँग्रेस आणि राजद हे प्रमुख पक्ष रिंगणात असतील
नवी दिल्ली : बिहार विधानसभेची निवडणूक लांबणीवर टाकण्याची राजकीय पक्षांची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सोमवारी बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक वेळेवरच घेतली जाईल याचा येथे पुनरुच्चार केला आणि निवडणूक आयोग कोरोना विषाणूची परिस्थिती नजरेसमोर ठेवून तयारी करीत आहे व ती करताना आवश्यक ती खबरदारीही घेत आहे, असे सांगितले.
बिहारमधील राष्ट्रीय जनता दल आणि लोकजनशक्ती पक्षासह इतर राजकीय पक्षांनी विधानसभेची निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी आयोगाकडे केली होती. निवडणूक याच वेळी घेऊन लक्षावधी लोकांचे जीवित धोक्यात घालणे योग्य ठरणार नाही, असे लोकजनशक्ती पक्षाने आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. दरम्यान, या निवडणुकीत सत्ताधारी जेडीएस-भाजपा, काँग्रेस आणि राजद हे प्रमुख पक्ष रिंगणात असतील.