'नितीश कुमार यांच्यात नेतृत्वात बिहार विधानसभा निवडणूक लढवली जाईल', भाजपची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 03:07 PM2024-06-06T15:07:26+5:302024-06-06T15:08:11+5:30

दिल्लीमध्ये नवीन सरकारच्या स्थापनेपूर्वीच बिहारमधून मोठी बातमी समोर आली आहे.

'Bihar assembly elections will be contested under the leadership of Nitish Kumar', BJP announced | 'नितीश कुमार यांच्यात नेतृत्वात बिहार विधानसभा निवडणूक लढवली जाईल', भाजपची घोषणा

'नितीश कुमार यांच्यात नेतृत्वात बिहार विधानसभा निवडणूक लढवली जाईल', भाजपची घोषणा

Bihar Politics : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या बिहार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहार भाजपचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी मोठी घोषणा केली आहे. 2025 ची विधानसभा निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

आज बिहार भाजपची बैठक पार पडली, या बैठकीनंतर सम्राट चौधरी यांनी आगामी विधानसभा निवडणुकांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी म्हणाले की, बिहारमध्ये जनतेने आम्हाला 75 टक्के जागा जिंकून दिल्या आहेत. आमच्या कार्यक्षम निवडणूक व्यवस्थापनाचा हा परिणाम आहे. आम्हाला आमच्या एनडीएतील नेत्यांबद्दल कोणतीही शंका नाही. काही लोकांना मागच्या दाराने, चोर दरवाजाने आत यायचे आहे. त्यांचे लोक संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आम्ही नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली 1996 पासून बिहारमध्ये निवडणूक लढवत आहोत आणि पुढेही लढवू.

दरम्यान, बुधवारी जेडीयूचे वरिष्ठ नेते आणि मंत्री डॉ. विजय कुमार चौधरी यांनीदेखील स्पष्ट केले होते की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी 2025 मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा केला आहे. 2025 च्या निवडणुका बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश यांच्या नेतृत्वाखालीच लढल्या जातील. आता भाजपच्या सम्राट चौधरी यांनीदेखील यावर शिक्कामोर्तब केला. 

नितीश-चंद्राबाबू किंगमेकर
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नितीश कुमार आणि टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू किंगमेकर म्हणून समोर आले आहेत. एनडीएला 543 पैकी 293 जागा मिळाल्या, तर इंडिया आघाडीला 233 जागा मिळू शकल्या. भाजपला 240 जागा मिळाल्या, परंतु 272 च्या जादुई आकड्याला स्पर्श करू शकले नाही. आता एनडी सरकार तेलुगु देसम पार्टी आणि जनता दल (युनायटेड) वर अवलंबून आहे. नितीश यांच्या पक्षाला 12 जागा मिळाल्या आहेत, तर टीडीपी 16 जागांसह दोन नंबरचा पक्ष बनला आहे.

Web Title: 'Bihar assembly elections will be contested under the leadership of Nitish Kumar', BJP announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.