'जम्मू-काश्मीरमधील बिहारींच्या हातात आत्मरक्षणासाठी AK-47 बंदुका द्या', भाजपा आमदाराची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 05:29 PM2021-10-21T17:29:36+5:302021-10-21T17:31:12+5:30

Jammu-Kashmir Attack: गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये बिहारी नागरिकांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य केलं जात असल्यामुळे बिहारी जनतेमध्ये प्रचंड संताप आहे.

Bihar bjp mla gynendra gyanu demand to government provide ak 47 to people for security | 'जम्मू-काश्मीरमधील बिहारींच्या हातात आत्मरक्षणासाठी AK-47 बंदुका द्या', भाजपा आमदाराची मागणी

'जम्मू-काश्मीरमधील बिहारींच्या हातात आत्मरक्षणासाठी AK-47 बंदुका द्या', भाजपा आमदाराची मागणी

Next

Jammu-Kashmir Attack: गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्येबिहारी नागरिकांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य केलं जात असल्यामुळे बिहारी जनतेमध्ये प्रचंड संताप आहे. सर्वसामान्य जनतेसोबतच राज्याचे नेते देखील खूप संतापलेले पाहायला मिळाले आहेत. सरकार आणि विरोधी पक्षातील नेते केंद्र सरकारकडे याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी करत आहेत. आता तर बिहारमधील एका भाजपा आमदारानं धक्कादायक मागणी केली आहे. भाजपा आमदार ज्ञानेंद्र ज्ञानू (BJP MLA Gynendra Gyanu) यांनी जम्मू-काश्मीरमध्ये वास्तव्याला असलेल्या बिहारी नागरिकांना आत्मरक्षणासाठी AK-47 बंदुका देण्याची मागणी केली आहे. 

भारतीय संविधानात काही महत्त्वाचे बदल करुन सध्याची परिस्थिती पाहता जम्मू-काश्मीरमध्ये वास्तव्याला असलेल्या परराज्यातील नागरिकांना शस्त्र बाळगण्याचा परवाना सरकारनं द्यायला हवा. तेथील बिहारी नागरिकांना सरकारनं मोफत AK-47 बंदुका घेऊन द्यायला हव्यात जेणेकरुन त्यांना स्वत:चं रक्षण करता येईल, असं विधान ज्ञानेंद्र ज्ञानू यांनी केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांत परराज्यातील नागरिकांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य केलं जात असल्याच्या घटनेचा कठोर शब्दांत त्यांनी निषेध व्यक्त केला. 

"दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये गरीब नागरिकांची हत्या करत आहेत. रोजंदारीवर उदरनिर्वाह करणाऱ्या निष्पाप नागरिकांचा जीव घेतला जात आहे. दहशतवादी पाकिस्तानच्या साथीनं बिहारी जनतेला लक्ष्य करत आहेत. केंद्र सरकारनं याची गंभीर दखल घेऊन कारवाई करायला हवी. परराज्यातील नागरिकांना सुरक्षा सरकारनं द्यायला हवी", असं ज्ञानेंद्र यांनी म्हटलं आहे. 

दुसरीकडे बिहारचे उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांनी पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडून टाकण्याची मागणी करत भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना रद्द करण्याचीही गोष्ट बोलून दाखवली आहे. जम्मू-काश्मीरलमधील हिंसाचार लक्षात घेता पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारत-पाक क्रिकेट सामना रद्द केला जावा, अशी मागणी तारकिशोर प्रसाद यांनी केली होती. 

Web Title: Bihar bjp mla gynendra gyanu demand to government provide ak 47 to people for security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.