राडाच! तू पुढे की मी पुढे... विधानसभेबाहेर एकमेकांना भिडले भाजपाचे आमदार, चिघळला वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 11:05 AM2023-03-01T11:05:49+5:302023-03-01T11:18:14+5:30
विधानसभेबाहेर भाजपाचे दोन आमदार एकमेकांना भिडल्य़ाची धक्कादायक घटना समोर आली आहे.
बिहार विधानसभेबाहेर भाजपाचे दोन आमदार एकमेकांना भिडल्य़ाची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्रकार परिषदेदरम्यान कॅमेऱ्यासमोर उभे राहण्यावरून दोन्ही आमदारांमध्ये वाद झाला. यावेळी एका आमदाराने दुसऱ्या आमदाराला भाषेचा सन्मान राखण्याचा सल्लाही दिला. प्रकरण अधिकच चिघळत असल्याचे पाहून विरोधी पक्षनेते विजयकुमार सिन्हा यांना हस्तक्षेप करावा लागला, त्यानंतरच प्रकरण मिटले.
बिहार सरकारने मंगळवारी अर्थसंकल्प सादर केला. यानंतर विरोधी पक्षनेते विजय कुमार सिन्हा अर्थसंकल्पावर पत्रकार परिषद घेत होते. यादरम्यान भाजपा आमदार अरुण सिन्हा आणि संजय सिंह यांच्यात विजय कुमार सिन्हा कॅमेऱ्यासमोर उभे राहण्यावरून वाद झाला. यादरम्यान अरुण सिन्हा यांनी संजय कुमार यांना भाषेची प्रतिष्ठा राखण्याचा सल्लाही दिला. तर संजय कुमार समोर उभे राहण्यासाठी धक्काबुक्की करताना दिसले.
परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून विजय कुमार सिन्हा मदतीला आले आणि त्यांनी दोन्ही नेत्यांना भांडण न करण्याचा सल्ला दिला. याच दरम्यान एक आमदार याबाबत सल्ला देताना दिसला. दोघांचेही स्पष्टीकरण देत विजय सिन्हा यांनी एका आमदाराला डाव्या बाजूला तर दुसऱ्या आमदाराला उजव्या बाजूला उभे केले. यानंतर हे प्रकरण मिटले.
बिहारच्या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षनेते विजय कुमार सिन्हा यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, अर्थसंकल्पात नवीन काहीच नाही, हे सरकार फक्त एनडीए सरकारचे काम दाखवत आहे. बिहारमध्ये काका-पुतण्या यांचा वाद सुरू आहे. ठगबंधनचे सरकार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"