शाब्बास पोरा! घरात वीज नाही, मेणबत्ती लावून अभ्यास केला; परीक्षेत टॉपर झाला, भविष्यात व्हायचंय...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 03:35 PM2023-03-22T15:35:12+5:302023-03-22T15:39:27+5:30

चंदनने आपल्या यशाचे श्रेय वडील सुनील चौधरी, आई रेखा देवी, भाऊ आणि शिक्षकांना दिले आहे.

bihar board 12th inter topper chandan kumaar 12th arts stream | शाब्बास पोरा! घरात वीज नाही, मेणबत्ती लावून अभ्यास केला; परीक्षेत टॉपर झाला, भविष्यात व्हायचंय...

फोटो - news18 hindi

googlenewsNext

बिहारच्या गया जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 90 किमी अंतरावर असलेल्या इमामगंज ब्लॉकच्या मुलाने इंटरमीडिएट आर्ट्समध्ये बिहारमध्ये पाचवे स्थान मिळवून या प्रदेशाचे नाव उंचावले आहे. चंदन कुमार असं य़ा मुलाचं नाव असून त्याने बिहार इंटरमिडिएट परीक्षेत आर्ट्सच्या पेपरमध्ये 465 गुण मिळवले आहेत. परीक्षेचा निकाल लागल्यापासून त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी निकाल लागला त्यावेळी चंदन कुमारचे वडील हातगाडीवर चणे विकत होते.

पाथरा गावातील रहिवासी असलेल्या चंदनने कला शाखेत बिहारमध्ये पाचवा आणि गया जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. चंदनने सांगितले की तो अत्यंत गरीब कुटुंबातून आला आहे.  त्याच्या घरात वीजही नाही. मी मेणबत्ती लावून अभ्यास केला आणि यश मिळवले. चंदन सांगतो की, तो किमान आठ ते नऊ तास अभ्यास करायचा. त्यामुळे त्याला चांगले गुण मिळाले. चंदनने आपल्या यशाचे श्रेय वडील सुनील चौधरी, आई रेखा देवी, भाऊ आणि शिक्षकांना दिले आहे.

चंदन कुमारचे वडील सुनील चौधरी एका हातगाडीवर भिजवलेले चणे विकतात. आपला संसार चालवतात. ऋतुमानानुसार कधी कधी व्यवसायातही बदल होतो. चंदनने सांगितले की, त्याचे सुरुवातीचे शिक्षण पाथरा टांड प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर इमामगंज येथील आदर्श सरकारी शाळेतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी राणीगंज येथील पब्लिक हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. चंदन म्हणतो की, त्याला सर्व साधनं मिळाली असती तर तो पाचवा नाही तर पहिला आला असता.

चंदनने सांगितले की, आयएएस होऊन देशसेवा करायची आहे. चंदनच्या पालकांनी सांगितले की, त्याचे आयएएस होण्याचे स्वप्न आहे. मुलाचे आयएएस होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे वडिलांनी सांगितले. आईने सांगितले की ती तिच्या पतीसोबत दोन हातगाड्या घेऊन चणे विकून पैसे कमावते. मुलाला शिकवण्यात कोणतीही कसर सोडली जाणार नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: bihar board 12th inter topper chandan kumaar 12th arts stream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.