बिहारमध्ये नदीत बोट उलटली; पाच जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता

By कुणाल गवाणकर | Published: November 5, 2020 12:23 PM2020-11-05T12:23:53+5:302020-11-05T12:24:14+5:30

अनेक जण बेपत्ता असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Bihar Boat with 100 onboard capsizes in river Ganga in Bhagalpur 5 dead | बिहारमध्ये नदीत बोट उलटली; पाच जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता

बिहारमध्ये नदीत बोट उलटली; पाच जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता

Next

पाटणा: बिहारच्या भागलपूरमधील नवगछिया भागात एक बोट उलटली आहे. गोपालपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता आहेत. या बोटीत १०० पेक्षा अधिक जण होते. घटनास्थळी सध्या एसडीआरएफची पथकं दाखल झाली आहेत. 

गंगेच्या उपनदीत बोट उलटताच एकच खळबळ माजली. आतापर्यंत जवळपास २५ प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे. पैकी १५ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बोट उलटल्यानंतर बेपत्ता झालेल्या प्रवाशांचा सध्या शोध सुरू आहे. 

दुर्घटनास्थळी एसडीआरएफच्या पथकांसह स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे. अद्याप अनेक जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. नदीत उलटलेल्या बोटीत महिलांची संख्यादेखील जास्त होती. अनेक जण बेपत्ता असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
 

Web Title: Bihar Boat with 100 onboard capsizes in river Ganga in Bhagalpur 5 dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Biharबिहार