शेळ्या चरायला गेलेल्या मुलांना सापडला बॉम्ब, बॉल समजून हातात घेताच फुटला, 5 मुले जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 01:31 PM2023-10-06T13:31:33+5:302023-10-06T13:32:21+5:30

काही दिवसांपूर्वी परिसरात दरोडा पडला होता, त्यातील आरोपींनी हे बॉम्ब लपून ठेवल्याचा अंदाज आहे.

bihar-bomb-blast-in-araria-5-children-injured-police-searching | शेळ्या चरायला गेलेल्या मुलांना सापडला बॉम्ब, बॉल समजून हातात घेताच फुटला, 5 मुले जखमी

शेळ्या चरायला गेलेल्या मुलांना सापडला बॉम्ब, बॉल समजून हातात घेताच फुटला, 5 मुले जखमी

googlenewsNext

Bomb Blast in Bihar: बिहारच्या अररियामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील राणीगंज पोलीस स्टेशन हद्दीतील कॅनॉल गेटजवळ बॉम्बचा स्फोट झाला, या घटनेत शेळ्या चरणारी पाच मुले जखमी झाली. त्यापैकी एका मुलाची प्रकृती गंभीर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मुलांना बॉम्ब सापडला, त्यांनी बॉल समजून उचलला आणि खेळायला सुरुवात केली, त्याचवेळी बॉम्बचा स्फोट होऊन मुले जखमी झाली. 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने घटनास्थळ गाठून सर्व जखमी मुलांना उपचारासाठी राणीगंज रुग्णालयात दाखल केले. या घटनेत अख्तरी प्रवीण या मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रवीणसह आणखी चार मुले जखमी झाली असून, 12 वर्षीय मोहम्मद अफजल, 16 वर्षीय सोनू कुमार, 7 वर्षीय साजिद नदाफ आणि 10 वर्षीय जुल्फराज, अशी त्यांची नावे आहेत. चौघांवर राणीगंज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, तर अख्तरी प्रवीणला अधिक उपचारासाठी अररिया येथे पाठवण्यात आले आहे.

दुसरा बॉम्ब निकामी करण्यात आला
घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ रामपुकर सिंह मोठ्या पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. एफएसएल टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. बॉम्ब निकामी पथक आल्यावर दुसरा बॉम्ब निकामी करण्यात आला. एफएसएल पथक रात्री उशिरापर्यंत तपासात व्यस्त होते. या घटनेबाबत स्थानिकांनी सांगितले की, दररोज प्रमाणे आजही 22 आरडी कालव्याच्या गेटजवळ मुले म्हैस-बकरी चरण्यासाठी गेले होते, तिथे खेळताना त्यांना एक पांढऱ्या रंगाचे बंडल सापडले. चेंडू समजून मुले त्याच्याशी खेळू लागली, यावेळी अचानक बॉम्बचा स्फोट झाला.

 

Web Title: bihar-bomb-blast-in-araria-5-children-injured-police-searching

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.