Bihar Bridge : “वाऱ्यामुळे…” पूल पडण्याचं कारण ऐकून गडकरी झाले अवाक्; IAS अधिकाऱ्यानं दिलं चक्रावणारं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 10:15 AM2022-05-10T10:15:17+5:302022-05-10T10:20:35+5:30
Bihar Bridge Collapse : बिहारमधील सुल्तानगंज पासून अगुआनी घाट दरम्यान तयार होत असलेला ब्रिज पडल्याचं कारण ऐकून गडकरीही अवाक् झाले.
Bihar Bridge Collapse : बिहारमध्ये तयारहोत असलेल्या एका पुलाचा काही भार पडल्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना मिळालेल्या उत्तरानं ते अवाक् झाले. गडकरी यांना असं काही कारण सांगण्यात आलं जे त्यांच्या पचनीच पडलं नाही. जोरदार वारा आणि वादळामुळे हा ब्रिज पडल्याचं कारण त्यांच्या सचिवांनी दिलं.
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना मिळालेल्या उत्तरानं चक्क अवाक् झाले. २९ एप्रिल रोजी सुल्तानगंजमध्ये गंगा नदीवर तयार होत असलेल्या पुलाचा एक भाग पडला होता. यामध्ये कोणातीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली नाही. याबाबत गडकरी यांनी एका कार्यक्रमात भाष्य केलं. बिहारमध्ये २९ एप्रिल रोजी पूल पडला होता. मी या संदर्भात माझ्या सचिवांना विचारणा केली. तेव्हा त्यांनी वेगवान वारा आणि वादळामुळे हा पूल पडल्याचं कारण दिल्याचं गडकरी म्हणाले.
एखादा आयएएस अधिकारी अशाप्रकारच्या स्पष्टीकरणावर कसा विश्वास ठेवू शकतो? असा सवालही त्यांनी केला. “जोरदार वारे आणि वादळामुळे कोणताही पूल कसा पडू शकतो? नक्कीच काहीतरी चूक झाली असेल, ज्यामुळे हा पूल पडला पडला असावा,” असंही ते म्हणाले. कार्यक्रमादरम्यान, गडकरींनी गुणवत्तेत कोणतीही कसर न सोडता पुलांची निर्मिती केली जावी, यावर भर दिला. या पुलाची निर्मिती २०१४ मध्ये सुरू झाली होती. हा पूल २०१९ मध्ये पूर्ण होणार होता. परंतु अद्यापही त्याचं काम पूर्ण झालेलं नाही.