प्रशांत किशोर एका निवडणुकीत सल्ला देण्यासाठी किती कोटी रुपये घेतात? स्वतःच केला खुलासा; रक्कम जाणून थक्क व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 09:44 AM2024-11-02T09:44:59+5:302024-11-02T09:45:43+5:30
आपण प्रचारासाठी पैसा कुठून आणतात, असा प्रश्न आपल्याला नेहमीच विचारला जातो? तर आपण...!
जन सूरज पक्षाचे संयोजक तथा माजी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी स्वतःसंदर्भात एक मोठा खुलासा केला आहे. किशोर म्हणाले, जेव्हा आपण निवडणूक रणनीतीकार म्हणून काम करत होतो, तेव्हा केवळ एका निवडणुकीत कुठल्याही पक्षाकडून अथवा नेत्याकडून सल्ला देण्यासाठी 100 कोटी अथवा त्याहूनही अधिक शुल्क घेत होतो. यावेळी, आपण स्थापन केलेले सरकार दहा राज्यांत सुरू असल्याचेही ते म्हणाले.
प्रशांत किशोर यांनी बिहारच्या बेलागंज येथे होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान गुरुवारी हा खुलासा केला. बिहारमधील बेलागंज, इमामगंज, रामगड आणि तरारी या चार विधानसभा जागांसाठी 13 नोव्हेंबरला पोटनिवडणूक होत आहे. यात प्रशांत किशोर यांच जन सुराज पक्ष पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. किशोर यांनी या चारही जागांवर आपले उमेदवार दिले आहेत.
केवळ सल्ला देण्यासाठी घेतो ₹100 कोटी -
प्रशांत किशोर हे गुरुवारी बेलागंजमध्ये जन सूरजचे उमेदवार मोहम्मद अमजद यांच्या समर्थनार्थ प्रचार करत होते. यावेळी, आपण प्रचारासाठी पैसा कुठून आणतात, असा प्रश्न आपल्याला नेहमीच विचारला जातो? तर आपण निवडणुकीमध्ये पक्षाच्या कोणत्याही नेत्याला सल्ला देण्यासाठी ₹100 कोटींहून अधिक शुल्क आकारतो, असे त्यांनी म्हटले आहे.
"10 राज्यातं सुरू आहे आपण बनवलेलं सरकार" -
एका प्रचारसभेदरम्यान प्रशांत किशोर म्हणाले, "10 राज्यांत आपण बनवलेले सरकार सुरू असेल, तर आम्हाला आमच्या प्रचारासाठी टेंट आणि तंबू उभारायला पैसे मिळणार नाहीत का? तुम्ही आम्हाला इतके कमकुवत समजत आहात का? बिहारमध्ये कुणी ऐकले नसेल, एका निवडणुकीत एखाद्या पक्षाला अथवा उमेदवाराला सल्ला देण्यासाठी आमचे शुल्क ₹100 कोटी अथवा त्याहूनही अधिक आहे.
प्रशांत किशोर पुढे म्हणाले, "आम्ही 2 वर्षांपर्यंत आपल्या अभियानासाठी टेंट आणि तंबू लावत राहू आणि यानंतर, केवळ एका निवडणुकीत एखाद्याला सल्ला दिला तर सर्वच्या सर्व पैसा एकाच दिवसात येऊन जाईल."