पुन्हा बिहार! नितीश कुमार आज उद्घाटन करणार होते; मेगा ब्रिजचा रस्ताच वाहून गेला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 12:28 PM2020-08-12T12:28:26+5:302020-08-12T12:41:39+5:30

गेल्या महिन्यातही असाच नवा पूल पुरामुळे वाहून गेला होता. १६ जून रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पटना येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या पूलाचं उद्धाटन केले होते. मात्र एक महिन्यात पाण्याच्या वेगवान प्रवाहात पूल तुटला होता.

bihar chhapra mega bridge approach road damaged; cm nitish kumar going to inaugurate today | पुन्हा बिहार! नितीश कुमार आज उद्घाटन करणार होते; मेगा ब्रिजचा रस्ताच वाहून गेला

पुन्हा बिहार! नितीश कुमार आज उद्घाटन करणार होते; मेगा ब्रिजचा रस्ताच वाहून गेला

Next

बिहारमध्ये नव्याने निर्माण झालेले पूल कोसळण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. निवडणूक तोंडावर आल्याने मुख्यमंत्री नितीश कुमार विकासकामांचे उद्घाटन करण्यामागे लागले आहेत. आज छपरामधील बंगरा घाट महासेतूला जाणारा अॅप्रोच रस्ताच उद्ध्वस्त झाला आहे. धक्कादायक म्हणजे या कामासाठी 509 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. या पुलाचे नितीशकुमार आज उद्घाटन करणार होते. 


गेल्या महिन्यातही असाच नवा पूल पुरामुळे वाहून गेला होता. १६ जून रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पटना येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या पूलाचं उद्धाटन केले होते. मात्र एक महिन्यात पाण्याच्या वेगवान प्रवाहात पूल तुटला होता. सत्तरघाट महासेतूचा हा पाळगंजमधील पूल होता. या प्रकारामुळे बिहार सरकारवर जोरदार टीका होऊ लागली होती. 


दरम्यान आज नितीश कुमार बंगरा घाट महासेतूच्या मेगा ब्रिजचे उद्घाटन करणार होते. त्यााधीच या पुलाकडे जाणार रस्ता खचला आहे. वैकुंठपूरमध्ये सारण बंधारा फुटल्याने बंगरा घाट महासेतूचा हा रस्ता वाहून गेल्याचे सांगितले जात आहे. जवळपास 50 मीटरचा रस्ता वाहून गेला असून बिहार राज्य पूल निर्माण निगमचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. दोनहून अधिक जेसीबी मशीन आणि शेकडो कामगारांना हा रस्ता पुन्हा बांधण्यासाठी कामाला लावण्यात आले आहे. 


या घटनेवर लालुप्रसाद यांच्यीा राजदने टोला लगावला आहे. गोपालगंजच्या बंगरा घाटचा पूल मुख्यमंत्र्यांच्या उद्घाटनाआधीच तुटला आहे. आता भाजपा आणि जेडीयूवाले हा पूल नाही तर अॅप्रोच रोड होता, जसे काही हा रोड विरोधकांनीच बनविला, असा कांगावा करणार आहेत. मुख्यमंत्री तरीही उद्धाटन करणार आहेत. कारण आजकाल कोणत्याही नवीन, जुन्या, बेजार, तुटलेल्या गोष्टींचे उद्घाटन करण्याची परंपरा बनली आहे, अशी टीका केली आहे. 
बंगरा घाट महासेतूच्या छपरा बाजुला जवळपास 11 किमी आणि मुझफ्परपूरबाजुला 8 किमी लांब अॅप्रोच रस्ता बनविण्यात आला आहे. महासेतू आणि या अॅप्रोच रस्त्यासाठी 509 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

Gold Rate Today : सोन्या, चांदीचे दर गडगडले; कोरोना व्हॅक्सिनचा प्रभाव

OMG! न्युझीलंडवर कोरोनाचा छुपा वार; 102 दिवसांनंतर 4 नवे रुग्ण, ऑकलंड लॉकडाऊन

CoronaVaccine: कोरोना लसीवर रशियाचा शॉर्टकट धोक्याचा; जागतिक तज्ज्ञांचा गंभीर इशारा

पंतप्रधान मोदी लवकरच मोठ्या घोषणा करण्याची शक्यता; हे आहेत अंदाज

खतरनाक Video! WWE मध्ये नव्या सुपरस्टार्सची एन्ट्री; रिंगच तोडल्याने भरली धडकी

चिनी कंपन्यांवर आयकर विभागाचे छापे; 1000 कोटींचे हवाला 'घबाड' हाती लागले

मध्यरात्री पानिपतच्या हायवेवर 'पती, पत्नी और वो'मध्ये धुमशान; दीराच्या मदतीने पकडले

Gold Rate: सोन्याची झळाळी! दिवाळीपर्यंत 70000 वर जाण्याची शक्यता; गुंतवणूक करायची का?

Web Title: bihar chhapra mega bridge approach road damaged; cm nitish kumar going to inaugurate today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.