बिहारच्या मुख्यमंत्री पदावर पुन्हा नितीश कुमार
By admin | Published: February 20, 2015 02:00 PM2015-02-20T14:00:30+5:302015-02-20T17:35:16+5:30
बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणं ही भावनेच्या भरात केलेली चूक होती अशी कबुली नितिश कुमार यांनी दिली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. २० - रविवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता जनता दल संयुक्तचे अध्यक्ष नितीश कुमार हे बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणं ही चूक होती अशी कबुली नितिश कुमार यांनी दिली आहे. त्यावेळी तो निर्णय भावनेच्या भरात घेतल्याचे ते म्हणाले. मात्र, आता बिहारच्या सर्वांगिण विकासासाठी काम करायचं असल्याचं नितिश म्हणाले. जनता दलात पडू घातलेल्या फुटीबद्दल बोलताना नितिश म्हणाले की भाजपाने जनता दलाच्या आमदारांना बहकावले असून भाजपा जातीपातीच्या राजकारणाला खतपाणी गालत असल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपाने जुगाड करत घोडेबाजार भरवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा प्रयत्न फसल्याचे नितिश म्हणाले.
आम्हाला आता सरकार चालवण्याची संधी मिळणार असल्याचे सांगताना मांझी यांनी यापूर्वीच राजीनामा द्यायला हवा असे मत व्यक्त केले. भाजपा सत्तेसाठी हपापलेला पक्ष असून त्यांच्या आश्वासनांना भुलू नका असे नितिश कुमार म्हणाले. लोकसभेच्या निवडणुका हरल्यानंतर राजीनामा दिल्याबद्दल मी जनतेची माफी मागतो असेही नितिश कुमार म्हणाले. आम्हाला जनतेची सेवा करायची आहे ती करायची संधी मिळावी असे सांगतानाच बिहारला विकासाच्या वाटेवर नेऊ आणि देशाच्या विकासात बिहार भर घालेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. मांझी व त्यांचे सहकारी काय भूमिका घेतील याबाबत आपल्याला कल्पना नसल्याचे नितिश म्हणाले.
बिहारमध्ये सत्ता स्थापन करण्याचा दावा करणारे पत्र राज्यपालांना पाठवल्याचे नितिश कुमार म्हणाले. राज्यपालांच्या निमंत्रणाची आम्ही वाट बघत असल्याचे नितिश म्हणाले. जितनराम मांझी यांची ओळखच पार्टीने करून दिली आहे. ओळख तोंडामुळे नसते तर कामामुळे असते. माझ्या कामानं माझी ओळख करून दिली आहे, तर मांझी यांना कुणी ओळखत नसताना पक्षामुळे त्यांना ओळख मिळाल्याचे नितिश म्हणाले.