'इकडे तिकडे जाणार नाही, आता इथेच राहणार', PM मोदींच्या भेटीनंतर नितीश कुमार यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 08:51 AM2024-02-08T08:51:38+5:302024-02-08T08:54:19+5:30

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

Bihar Chief Minister Nitish Kumar met Prime Minister Narendra Modi on Wednesday. | 'इकडे तिकडे जाणार नाही, आता इथेच राहणार', PM मोदींच्या भेटीनंतर नितीश कुमार यांचं विधान

'इकडे तिकडे जाणार नाही, आता इथेच राहणार', PM मोदींच्या भेटीनंतर नितीश कुमार यांचं विधान

नवी दिल्ली:  बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. जेडीयूने पुन्हा एनडीएमध्ये सामील झाल्यानंतर आणि बिहारमध्ये भाजपासोबत सरकार स्थापन केल्यानंतर पंतप्रधान मोदींसोबतची ही त्यांची पहिली भेट आहे.

नितीश कुमार यांनी गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचीही भेट घेतली. नड्डा यांची भेट घेतल्यानंतर नितीश कुमार म्हणाले की, भाजपा आणि जेडीयू १९९५ पासून एकत्र आहेत. दरम्यान, ते निश्चितपणे एक दोन वेळा इकडे तिकडे गेले. पण पुन्हा कधीच जाणार नाही. आता इकडे तिकडे जाणार नाही, आता इथेच राहणार....असं नितीश कुमार यांनी सांगितले.

नितीश कुमार २८ जानेवारी रोजी पुन्हा एनडीएमध्ये सामील झाले. राजद सोडण्यासोबतच त्यांनी मुख्यमंत्रिपदाचाही राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर ते म्हणाले होते, आम्ही खूप मेहनत करत होतो आणि इतर (आरजेडी) सर्व श्रेय घेत होते. आता नव्या युतीत जात आहोत. राजीनामा दिल्यानंतर काही तासांनी नितीश पुन्हा भाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले. 

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नितीश म्हणाले, 'मी यापूर्वीही त्यांच्यासोबत होतो. आम्ही वेगवेगळ्या वाटांवर चाललो, पण आता आम्ही एकत्र आहोत आणि नेहमीच राहू. मी (एनडीए) जिथे होतो तिथे परत आलो आहे आणि आता कुठेही जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मुख्यमंत्री असताना नितीश यांचा हा चौथा यू-टर्न होता. ऑगस्ट २०२२मध्ये त्यांनी भाजप सोडला. आणि दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत ते पुन्हा एनडीएमध्ये सामील झाले.

Web Title: Bihar Chief Minister Nitish Kumar met Prime Minister Narendra Modi on Wednesday.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.