बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या ताफ्यावर दगडफेक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2018 04:35 PM2018-01-12T16:35:01+5:302018-01-12T18:38:27+5:30
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यावर अज्ञातांनी दगडफेक केली आहे. बक्सर जिल्ह्यातील नंदनमध्ये समिक्षा यात्रेसाठी ते गेले असता, त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकीत नितीश कुमार थोडक्यात बचावले आहेत.
पाटणा- बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यावर अज्ञातांनी दगडफेक केली आहे. बक्सर जिल्ह्यातील नंदनमध्ये समिक्षा यात्रेसाठी ते गेले असता, त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकीत नितीश कुमार थोडक्यात बचावले आहेत. दगडफेकीत नितीश कुमारांच्या ताफ्यातील अनेक सुरक्षारक्षक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, नंदर गावातील लोक बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांना दलित वस्तीमध्ये बोलवण्याची मागणी करत होते. याच मुद्द्यावरून स्थानिक लोक आणि अधिका-यांमध्ये वाद झाला. त्यानंतर संतप्त लोकांनी दगडफेक केली होती. ज्यात अनेक सुरक्षारक्षक गंभीर स्वरूपात जखमी झाले आहेत. नंदर गावात अनेक विकासाची कामं प्रलंबित आहेत. त्यामुळे लोक नितीश कुमारांनी भेट देऊन पाहणी करण्याची मागणी करत होते. परंतु नितीश कुमार नंदर गावातून निघून गेले आहेत.
Convoy of Bihar Chief Minister Nitish Kumar attacked, pelted with stones during a 'samiksha yatra' in Buxar's Nandan. CM rescued safely, security persons injured
— ANI (@ANI) January 12, 2018
दोन महिन्यांपूर्वीच एनडीएसोबत आलेल्या नितीश कुमार यांच्या पक्षाला मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. मात्र नितीश कुमार यांनी आपल्याला प्रसारमाध्यमांकडून मंत्रिमंडळ विस्ताराची माहिती मिळाल्याचं सांगितल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. यावरून लालू प्रसाद यांनी नितीश कुमारांची खिल्ली उडवण्याची संधी सोडली नाही. 'जेडीयूच्या काही नेत्यांनी शपथविधी कार्यक्रमात सामील होण्यासाठी कुर्ता - पायजमा शिवून ठेवला होता. पण त्यांना आमंत्रणच मिळालं नाही', अशी खिल्ली लालू प्रसाद यादव यांनी उडवली होती.
2010 रोजी भाजपाने डिनरच आमंत्रण देऊनही नितीश कुमार यांनी ते नाकारलं होतं, कारण त्यामध्ये नरेंद्र मोदी सामील होणार होते. तीन वर्षांनी 2014 रोजी जेव्हा नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं तेव्हा नितीश कुमार यांनी भाजपासोबतची आपली 17 वर्षांची युती तोडली होती. गेल्या दोन महिन्यांपूर्वीच पुन्हा एकदा नितीश कुमार यांनी महाआघाडीतून माघार घेत एनडीएशी हातमिळवणी केली आहे.