"हिंदी राष्ट्रभाषा आहे, त्यामुळं यायलाच हवी", 'इंडिया' आघाडीच्या बैठकीत नितीश कुमारांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 02:13 PM2023-12-20T14:13:25+5:302023-12-20T14:13:39+5:30

'इंडिया' आघाडीच्या बैठकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार संतापल्याचे दिसले.

Bihar Chief Minister Nitish slams DMK leader for seeking translation of Nitish speech in Hindi to English in INDIA Alliance Meeting | "हिंदी राष्ट्रभाषा आहे, त्यामुळं यायलाच हवी", 'इंडिया' आघाडीच्या बैठकीत नितीश कुमारांचा संताप

"हिंदी राष्ट्रभाषा आहे, त्यामुळं यायलाच हवी", 'इंडिया' आघाडीच्या बैठकीत नितीश कुमारांचा संताप

India Alliance Meeting Language Controversy | नवी दिल्ली : सत्ताधारी भाजपाला लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये रोखण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांनी एकजुट दाखवली असून 'इंडिया' आघाडीची स्थापना केली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विजयानंतर भाजपाचा आत्मविश्वास वाढला. पण, आगामी लोकसभेसाठी विरोधी पक्ष रणनीती आखताना दिसत आहेत. त्यासाठी सातत्याने बैठका घेऊन समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुसरीकडे, 'इंडिया' आघाडीतील पक्षांमधील आपापसातील मतभेदाच्या बातम्याही समोर येत आहेत. दिल्लीत झालेल्या बैठकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा संयम सुटला अन् त्यांनी हिंदी भाषेवरून आपल्याच मित्रपक्षाच्या नेत्याला सुनावले.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या भाषणानंतर द्रमुकचे ( Dravida Munnetra Kazhagam ) खासदार टीआर बालू यांनी इंग्रजी अनुवाद करण्याची मागणी केली. यावर हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचे सांगताना नितीश कुमार म्हणाले की, प्रत्येक नेत्याला हिंदी भाषा माहित असणे आवश्यक आहे. नितीश यांच्या या आग्रहानंतर बैठकीतील वातावरणात तापले होते. खरं तर द्रमुकची भूमिका आणि त्यांचे राजकारण हे नेहमी हिंदीविरोधी राहिले आहे. अशा परिस्थितीत या भाषा वादावरून 'इंडिया' आघाडीत मतभेद समोर आले आहेत. 

हिंदी अनुवादाची मागणी अन् नाट्यमय घडामोडी 
दरम्यान, नितीश कुमार 'इंडिया' आघाडीच्या बैठकीत संबोधित करत असताना DMK प्रमुख एके स्टॅलिन आणि टीआर बालू उपस्थित होते. नितीश हिंदीत बोलत असल्याने त्यांचे म्हणणे द्रमुकच्या नेत्यांना समजले नाही. टीआर बालू यांनी दुसरीकडे बसलेले आरजेडीचे राज्यसभा खासदार मनोज झा यांच्याकडे इशारा करत नितीश यांच्या भाषणाचा अनुवाद मागितला. अर्थात नितीश यांचे भाषण इंग्लिशमध्ये समजवण्याची विनंती बालू यांनी केली. मनोज झा यांनी नितीश कुमार यांच्या भाषणाचा अनुवाद करण्याची मागणी करताच नितीश यांना राग अनावर झाला. "आपण आपल्या देशाला हिंदुस्थान म्हणतो आणि हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. ही भाषा आपल्याला कळलीच पाहिजे", असे नितीश यांनी सांगून मनोज झा यांना भाषणाचा अनुवाद न करण्यास सांगितले.

Web Title: Bihar Chief Minister Nitish slams DMK leader for seeking translation of Nitish speech in Hindi to English in INDIA Alliance Meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.