आठ वर्षांच्या मुलीचं 28 वर्षांच्या मुलाशी लग्न! अशी आहे बिहारच्या 'बालिका वधू'ची खरी कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 08:51 AM2021-05-29T08:51:40+5:302021-05-29T08:51:47+5:30

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर या लग्नावर चर्चेला सुरुवात झाली. लोकांनी बाल विवाहाच्या मुद्द्यावर बिहार सरकारला घेरायलाही सुरुवात केली. तर, काही लोक सरकारकडे या मुलीला न्याय मिळावा, अशी मागणी करत आहेत.

Bihar child bride Eight year old girl married to a 28 year old man know what is the truth  | आठ वर्षांच्या मुलीचं 28 वर्षांच्या मुलाशी लग्न! अशी आहे बिहारच्या 'बालिका वधू'ची खरी कहाणी

आठ वर्षांच्या मुलीचं 28 वर्षांच्या मुलाशी लग्न! अशी आहे बिहारच्या 'बालिका वधू'ची खरी कहाणी

googlenewsNext

पाटणा - सोशल मिडियावर एक फोटो जबरदस्त व्हायरल होत आहे. या फोटोत नवविवाहित जोडपे दिसत आहे. मात्र, वाद निर्माण झाला तो नवरीच्या वयावरून. कारण नवरीच्या पोशाखात दिसत असलेली तरुणी मुलीसारखी दिसते. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर या लग्नावर चर्चेला सुरुवात झाली. लोकांनी बाल विवाहाच्या मुद्द्यावर बिहार सरकारला घेरायलाही सुरुवात केली. तर, काही लोक सरकारकडे या मुलीला न्याय मिळावा, अशी मागणी करत आहेत. मात्र, हे प्रकरण प्रशासनाकडे पोहोचल्यानंतर खळबळ उडाली.

प्रकरण प्रशासनाकडे पोहोचल्यानंतर प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासीठी एक टीम तयार केली. मात्र, या चौकशीत जी बाब समोर आली ती चकित करणारी आहे. खरे तर, जमुई जिल्ह्यातील अकौनी गावातील ज्या मुलीचा फोटो व्हायरल करून लोक सरकारला सवाल करत आहेत, ती मुलगी सरकारी दस्ताएवजांप्रमाणे अडल्ट आहे. ती 19 वर्षांची आहे. गेल्या 24 एप्रिलला तिचे लग्न झाले आहे आणि ती पतीसह तिच्या सासरी आहे.

मुलीनं स्वतःच सांगितलं सत्य -
बालविवाहाची चर्चा स्वतः तनू कुमारीनेच फेटाळली आहे. यासंदर्भात बोलताना तनू म्हणाली, तिचे लग्न तिच्या आणि दोन्ही कुटुंबीयांच्या सहमतीने झाले आहे. सोशल मिडियावर पसरलेले वृत्त पूर्णपणे चुकीचे आहे. ते फेटाळले जावे. तर दुसरीकडे, याप्रकरणी, प्रशासकीय पातळीवरही जाहिरात प्रसिद्ध करून संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. 

प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत म्हणण्यात आले आहे, की 25 मेरोजी सोशल मिडियाच्या माध्यमातून तथाकथित बालविवाहाची माहिती मिळाली होती. यानंतर प्रशासकीय अधिकारी घटनेत्या चौकशीसाठी वारिसलीगंज येथे पोहोचले. तेथे गावातील लोकांनी त्यांना सांगितले, की मुलीचे नाव तनु कुमारी, असे आहे. ती लहाणपणापासूनच मतासी (अकौनी), सिकन्दरा, जिल्हा जमुई येथे राहते. 

गावातील लोकांनी सांगितल्यानुसार, मुलीची आईदेखील तेथेच राहते. मुलीचे वडील दिल्ली येथे काम करतात. यानंतर संबंधित मुलीचे आधार कार्ड तपासण्यात आले. त्याची सत्यता पडताळण्यात आली. यानुसार, संबंधित मुलगी अडल्ट असून व्हायरल वृत्त पूर्णपणे फेक अथवा निराधार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Bihar child bride Eight year old girl married to a 28 year old man know what is the truth 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.