Video - हृदयस्पर्शी! मुख्याध्यापकांच्या बदलीनंतर विद्यार्थी ढसाढसा रडले; सरांचेही डोळे पाणावले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 03:15 PM2022-07-22T15:15:45+5:302022-07-22T15:30:05+5:30

Video - एका सरकारी शाळेतील मुख्याध्यापकाच्या बदलीनंतर विद्यार्थी ढसाढसा रडत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. सरांना मिठी मारून विद्यार्थी रडत आहेत.

bihar children cried bitterly over the transfer of headmaster in saharsa watch video | Video - हृदयस्पर्शी! मुख्याध्यापकांच्या बदलीनंतर विद्यार्थी ढसाढसा रडले; सरांचेही डोळे पाणावले

Video - हृदयस्पर्शी! मुख्याध्यापकांच्या बदलीनंतर विद्यार्थी ढसाढसा रडले; सरांचेही डोळे पाणावले

Next

नवी दिल्ली - विद्यार्थी आणि शिक्षकांमधील नातंच अनमोल असतं. काही शिक्षक असे असतात जे विद्यार्थ्यांना प्रचंड आवडतात. त्यांना लळा लावतात. पण अनेकदा बदलीनंतर त्यांना शाळा सोडावी लागते. अशीच एक हृदयस्पर्शी घटना आता समोर आली आहे. बिहारच्या सहरसामधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका सरकारी शाळेतील मुख्याध्यापकाच्या बदलीनंतर विद्यार्थी ढसाढसा रडत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. सरांना मिठी मारून विद्यार्थी रडत आहेत. मुख्याध्यापक मुलांची समजूत काढत होते पण यावेळी सरांचे डोळे देखील पाणावले. 

मिळालेल्या माहितीनुसार, सहरसा जिल्ह्यातील सोनपुरा गावात असलेल्या शाळेचे मुख्याध्यापक राजीव कुमार सिंह यांची बदली झाली. त्यांना निरोप देण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शाळेचे विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. राजीव कुमार सिंह यांनी सहा महिने मुख्याध्यापक म्हणून काम पाहिलं. सहा महिन्यांच्या कालावधीत त्यांनी खूप चांगलं काम केलं. प्रामुख्याने शाळेचा कायापालट केला. त्यामुळेच विद्यार्थ्यांना ते खूपच आवडायचे.

मुख्याध्यापक राजीव कुमार सिंह यांना निरोप देताना विद्यार्थी भावुक झाले. राजीव कुमार यांनी फक्त सहाच महिने मुख्याध्यापक म्हणून काम केलं. या कालावधीत त्यांनी शिक्षण व्यवस्था मजबूत करण्यास प्राधान्य दिलं. सरकारच्या योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळेल याकडे प्रामुख्याने लक्ष दिलं. राजीव कुमार यांना मुलांची पोटच्या मुलांप्रमाणे काळजी घेतली. त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष दिल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं आहे.

सहा महिन्यांनंतर राजीव कुमार सिंह यांच्या बदलीचा आदेश आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले. विद्यार्थिनी मुख्याध्यापकांना मिठी मारून रडल्या. त्यांना रडताना पाहून राजीव कुमार यांचेही डोळे पाणावले. भावुक झालेल्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थिनींना समजावलं. त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थिनी आणि मुख्याध्यापकांमधील हा जिव्हाळा पाहून सर्वांनाच गहिवरून आलं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ आता जोरदार व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: bihar children cried bitterly over the transfer of headmaster in saharsa watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.