बिहारमध्ये माओवादी आणि सुरक्षा दलांत चकमक, झोनल कमांडरसह तीन माओवादी ठार
By बाळकृष्ण परब | Published: November 22, 2020 12:56 PM2020-11-22T12:56:48+5:302020-11-22T12:57:47+5:30
Bihar News : बिहारमधील गया येथे सुरक्षा दले आणि माओवाद्यांदरम्यान, शनिवारी रात्री मोठी चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी माओवाद्यांच्या झोनल कमांडरसह तीन माओवाद्यांना ठार केले.
गया - बिहारमधील गया येथे सुरक्षा दले आणि माओवाद्यांदरम्यान, शनिवारी रात्री मोठी चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी माओवाद्यांच्या झोनल कमांडरसह तीन माओवाद्यांना ठार केले. गया येथील बाराचट्टी जंगल परिसरात केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाची कोब्रा बटालियन आणि बिहार पोलिसांच्या शोधमोहिमेदरम्यान माओवादी आणि सुरक्षा दलांमध्ये आमनासामना झाला.
रात्री १२ वाजून २० मिनिटांपासून दोन्हीकडून गोळीबारास सुरुवात झाली. या चकमकीत माओवाद्यांच्या झोनल कमांडरसह तिघे माओवादी ठार झाले. चकमकीत ठार झालेल्या कमांडरचे नाव आलोक यादव असल्याचे समोर आले आहे. या माओवाद्यांकडून एक एके-४७ आणि एक इन्सास रायफल जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, या चकमकीनंतर शोधमोहीम सुरू आहे.
#UPDATE: The naxal, identified as Alok alias Gulshan, had killed 2 civilians during a cultural program in Mahuri village of Gaya last night. Following this, an exchange of fire ensued between CoBRA commandos & naxals. Alok was carrying a reward of Rs 10 Lakhs on his head.#Biharhttps://t.co/CGJ0uR3Lbx
— ANI (@ANI) November 22, 2020
काही दिवसांपूर्वीच नक्षलवाद्यांनी एक सामुदायिक भवन डायनामाइट लावून उडवले होते. आपला प्रभाव दर्शवण्यासाठी नक्षलवाद्यांकडून सामुदायिक भवन उडवण्यात आल्याचे समोर आले होते. बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी शपथ घेण्यापूर्वी हा हल्ला घडवून आणण्यात आला होता.
१५ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे ११ वाजता बोधीबिगरा गावात नक्षलवाद्यांनी सामुदायिक भवन आयईईडी लावून उद्ध्वस्त केले होते. सामुदायिक भवन उद्ध्वस्त केल्यानंतर माओवाद्यांनी तिथे दोन आयईडी सोडले होते. तसेच एक पत्रकसुद्धा सोडण्यात आले होते. त्यामध्ये भाजपा आणि एनडीए सरकार उलथवण्याचा इशारा देण्यात आला होता.