“PM नरेंद्र मोदींना पराभूत करता येऊ शकते”; दिल्लीत अरविंद केजरीवाल-नितीश कुमारांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 03:37 PM2023-05-21T15:37:15+5:302023-05-21T15:38:15+5:30

Nitish Kumar-Arvind Kejriwal Meet: गेल्या काही आठवड्यातील नितीश कुमार आणि अरविंद केजरीवाल यांची ही दुसरी भेट आहे.

bihar cm nitish kumar meet chief minister arvind kejriwal in delhi | “PM नरेंद्र मोदींना पराभूत करता येऊ शकते”; दिल्लीत अरविंद केजरीवाल-नितीश कुमारांची भेट

“PM नरेंद्र मोदींना पराभूत करता येऊ शकते”; दिल्लीत अरविंद केजरीवाल-नितीश कुमारांची भेट

googlenewsNext

Nitish Kumar-Arvind Kejriwal Meet: आगामी लोकसभा निवडणुकांसाठी विरोधकांनी हळूहळू कंबर कसायला सुरुवात केली आहे. भाजपविरोधी पक्षांची एकजूट व्हावी आणि विरोधक एकजुटीने लढावेत, यावर भर दिला जात आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यासाठी पुढाकार घेताना पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली आहे. नितीश कुमार आणि अरविंद केजरीवाल यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. 

काही दिवसांपूर्वी नितीश कुमार यांनी महाराष्ट्र दौरा केला होता. यावेळी उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. यानंतर आता नितीश कुमारांनी दिल्लीत जाऊन अरविंद केजरीवाल यांना भेटले. या भेटीनंतर अरविंद केजरीवाल यांनी मीडियाशी संवाद साधला. केंद्र सरकारच्या अध्यादेशासंदर्भात चर्चा झाली. नितीश कुमार आपल्या बाजूने आहेत, अशी माहिती केजरीवाल यांनी दिली. 

PM नरेंद्र मोदींना पराभूत करता येऊ शकते

राज्यसभेत सर्व पक्ष एकत्र आले आणि अध्यादेश काढला नाही तर २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव होऊ शकतो असा संदेश जाऊ शकेल, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. नितीश कुमार म्हणालेत की, सुप्रीम कोर्टाचा आदेश फेटाळून दिल्लीच्या बाजूने केंद्राने अध्यादेश आणण्याच्या मुद्द्यावर दिल्लीच्या जनतेच्या पाठीशी उभे आहोत. केंद्राने हा अध्यादेश विधेयकाच्या स्वरूपात आणला तर सर्व बिगर भाजप पक्ष एकत्र आल्यास राज्यसभेत त्याचा पराभव होऊ शकतो. असे झाले तर भाजप सरकार २०२४ मध्ये संपेल असा संदेश जाऊ शकतो, असे केजरीवाल यांनी सांगितले. 

दरम्यान, नितीश कुमार बोलताना म्हणाले की, निवडून आलेल्या सरकारला दिलेले अधिकार कसे काढून घेतले जाऊ शकतात? ते संविधानाच्या विरोधात आहे. आम्ही अरविंद केजरीवाल यांच्या पाठीशी उभे आहोत. देशातील सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, असा पुनरुच्चार नितीश कुमार यांनी केला. दुसरीकडे, गेल्या काही आठवड्यातील नितीश कुमार आणि अरविंद केजरीवाल यांची ही दुसरी भेट आहे. 
 

Web Title: bihar cm nitish kumar meet chief minister arvind kejriwal in delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.