Nitish Kumar Meets Sharad Pawar: नितीश कुमारांनी घेतली शरद पवारांची भेट; भाजपविरोधी आघाडी मजबूत होणार? 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 05:50 PM2022-09-07T17:50:51+5:302022-09-07T17:52:43+5:30

नवी दिल्लीत शरद पवार आणि नितीश कुमार यांच्या झालेल्या भेटीनंतर आता राजकीय वर्तुळात अनेकविध कयास बांधले जात आहेत.

bihar cm nitish kumar meets ncp chief sharad pawar in new delhi | Nitish Kumar Meets Sharad Pawar: नितीश कुमारांनी घेतली शरद पवारांची भेट; भाजपविरोधी आघाडी मजबूत होणार? 

Nitish Kumar Meets Sharad Pawar: नितीश कुमारांनी घेतली शरद पवारांची भेट; भाजपविरोधी आघाडी मजबूत होणार? 

googlenewsNext

नवी दिल्ली: भाजपला सत्तेपासून दूर ठेवत एनडीएतूनही बाहेर पडलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली. देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना म्हणून याकडे पाहिले जात असून, या भेटीनंतर आता भाजपविरोधी आघाडी मजबूत करण्यात शरद पवार यशस्वी ठरतात का, याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

राजदसोबत महाआघाडी करत सत्ता स्थापन केल्यानंतर नितीश कुमार दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दिल्ली दौऱ्यात नितीशकुमार यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, सीताराम येचुरी, नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात शरद पवार आणि नितीश कुमार यांच्यात चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. नितीश कुमार यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांची एकजूट करण्यासाठी पुढाकार घेण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. 

शरद पवारांच्या मदतीने नितीश कुमार मोदींच्या विरोधात दंड थोपटणार

सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी विरोधी पक्षांकडून सुरु झाली आहे. शरद पवारांच्या मदतीने नितीश कुमार मोदींच्या विरोधात दंड थोपटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एनडीएतून बाहेर पडल्यानंतर नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. यानंतर नितीश कुमार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार हे विरोधी पक्षांची मोट बांधत आहेत. यामुळे नितीश कुमार यांनी घेतलेली भेट लक्षवेधी ठरली आहे. भाजप विरोधात मोहिम आखण्यासाठी शरद पवार देशभरातील विरोधी पक्ष नेत्यांची फळी उभारण्याचा प्रयत्न करत आहेत. मोदींविरोधात पंतप्रधान पदाचा प्रबळ दावेदार निवडण्याबाबत अद्याप विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये एकमत झाले नसले तरी मोदींना पाय उतार करण्याचा प्लान विरोधी पक्ष आखत असल्याच्या चर्चा आहेत. 

दरम्यान, के. चंद्रशेखर राव यांनी देखील भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी देखील राष्ट्रीय राजकारणाकडे मोर्चा वळवला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या एकजुटीचा सूत्रधार कोण असेल, यावर खल सुरू असल्याचे म्हटले जात आहे. ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, के.चंद्रशेखर राव आणि काँग्रेसने विरोधकांच्या एकजुटीसाठी प्रयत्न केला होता. 
 

Web Title: bihar cm nitish kumar meets ncp chief sharad pawar in new delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.