इनके हसबैंड जेल गए तब राबड़ी को मुख्यमंत्री बनाया: नितीश कुमार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 09:19 IST2025-03-08T09:17:26+5:302025-03-08T09:19:41+5:30
सभागृहात नितीशकुमार उभे राहिले व विरोधी आमदारांना फटकारले आणि म्हणाले की, ए सुनो, फालतू बात मत करो.

इनके हसबैंड जेल गए तब राबड़ी को मुख्यमंत्री बनाया: नितीश कुमार
एस. पी. सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा :बिहार विधान परिषदेत शुक्रवारी मुख्यमंत्री नितीशकुमार व राजदच्या आ. उर्मिला ठाकूर यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. मुख्यमंत्र्यांनी जागेवर बसून आक्षेप घेतल्याने ठाकूर यांनी विरोध केला. तेव्हा नितीशकुमार माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांच्यासह महिला आमदारांवर भडकले.
राबडीदेवी यांच्याकडे पाहून नितीशकुमार म्हणाले, यांचे पती जेलमध्ये गेले तेव्हा राबडीदेवींना मुख्यमंत्री केले. यांनी महिलांसाठी आजवर काय केले? महिलांसाठीची सर्व कामे आमच्या सरकारने केली. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर राजद, जदयु आमदारांच्या शाब्दिक चकमकीनंतर सभापतींनी सदस्यांना शांत केले.
‘त्यांची तब्येत ठीक नाही’
तेजस्वी यादव म्हणाले की, राबडीदेवी बिहारच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत. वय आणि नात्याने त्या नितीशकुमार यांच्यापेक्षा मोठ्या आहेत. अशा स्थितीत ते ज्याप्रकारे वक्तव्य करीत आहेत, ते पाहता त्यांची तब्येत ठीक नाही, हे सिद्ध होते. ते राज्य चालवण्यास योग्य नाहीत.
ए सुनो, फालतू बात मत करो
दोन्ही सभागृहांत नालंदामध्ये महिला हत्येच्या मुद्द्यावरून प्रचंड गदारोळ झाला. विरोधकांनी हौद्यामध्ये उतरून जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर नितीशकुमार उभे राहिले व विरोधी आमदारांना त्यांनी फटकारले. ते म्हणाले की, ए सुनो, फालतू बात मत करो. घटनेवर तत्काळ कारवाई झाली आहे.