Attack on CM Nitish Kumar : मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर बख्तियारपूरमध्ये हल्ला; सुरक्षेत मोठी चूक, VIDEO व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 09:48 PM2022-03-27T21:48:14+5:302022-03-27T21:49:11+5:30
योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर पाटण्यात परतलेले मुख्यमंत्री नितीश कुमार एका खाजगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बख्तियारपूर येथे पोहोचले होते.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर रविवारी एका युवकाने हल्ला केला. पाटण्यातील बख्तियारपूरमध्ये एका युवकाने त्यांना बुक्का मारला. मात्र, मुख्यमंत्र्यांना दुखापत झाली नाही. संबंधित युवकाला पोलीस ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. हा युवक मानसिकदृष्ट्या विक्षिप्त असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री एका खासगी कार्यक्रमासाठी बख्तियारपूर येथे गेले होते.
योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर पाटण्यात परतलेले मुख्यमंत्री नितीश कुमार एका खाजगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बख्तियारपूर येथे पोहोचले होते. यावेळी ते एका मूर्तीला हार घालण्यासाठी जात होते. तेवढ्यात उपस्थितांमधील एका व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या जवानांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतले.
Bihar | A youth tried to attack CM Nitish Kumar during a program in Bakhtiarpur. The accused was later detained by the Police.
— ANI (@ANI) March 27, 2022
(Viral video) pic.twitter.com/FoTMR3Xq8o
...तेव्हाही सुरक्षा रक्षकानं केलं होतं मुख्यमंत्र्यांचं रक्षण -
मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर यापूर्वीही हल्ला झाला होता. बिहार विधानसभा निवडणूक 2020 दरम्यान मधुबनी येथे झालेल्या एका निवडणूक सभेत उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने मुख्यमंत्री नितीश यांच्यावर कांदे आणि विट घेऊन हल्ला केला होता. यावेळी मंचावर उपस्थित सुरक्षा रक्षकाने मुख्यमंत्र्यांचे रक्षण केले होते.