बिहारमध्ये दारुबंदी कायम, नितीश कुमार सरकारला दिलासा

By admin | Published: October 7, 2016 02:01 PM2016-10-07T14:01:32+5:302016-10-07T14:01:32+5:30

नितीश कुमार सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला असून बिहारमधील दारुबंदी उठवण्याच्या पाटना उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे

Bihar continues to be barbaric, Nitish Kumar gets relief | बिहारमध्ये दारुबंदी कायम, नितीश कुमार सरकारला दिलासा

बिहारमध्ये दारुबंदी कायम, नितीश कुमार सरकारला दिलासा

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - नितीश कुमार सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला असून बिहारमधील दारुबंदी उठवण्याच्या पाटना उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे बिहारमध्ये दारुबंदी कायम राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दारुबंदी आणि मुलभूत हक्क या दोन्ही गोष्टी एकत्र येऊ शकत नाहीत असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. पाटना उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात बिहार सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. 
 
पाटणा उच्च न्यायालयाने बिहार सरकारने केलेल्या दारुबंदी कायद्याला बेकायदा ठरवत हा कायदा रद्द केला होता. एक ऑगस्ट रोजी बिहार विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात दारुबंदी विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यपाल राम नाथ कोविंद यांनी या विधेयकाला मंजुरी दिली होती. 
 

Web Title: Bihar continues to be barbaric, Nitish Kumar gets relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.