बापरे! ...अन् उपमुख्यमंत्र्यांच्या बहिणीने घेतला दुकानदाराचा चावा, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 10:45 AM2020-08-18T10:45:47+5:302020-08-18T10:55:06+5:30

रागाच्या भरात उपमुख्यमंत्र्यांच्या बहिणीने चक्क दुकानदाराचा चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

bihar deputy cm sushil modi sister makes ruckus for two sacks of rice | बापरे! ...अन् उपमुख्यमंत्र्यांच्या बहिणीने घेतला दुकानदाराचा चावा, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

बापरे! ...अन् उपमुख्यमंत्र्यांच्या बहिणीने घेतला दुकानदाराचा चावा, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

Next

नवी दिल्ली - नेते मंडळी आणि त्यांचे नातेवाईक हे अनेकदा विविध गोष्टींमुळ चर्चेत असतात. अशीच एक घटना बिहारमध्ये घडली आहे. रागाच्या भरात उपमुख्यमंत्र्यांच्या बहिणीने चक्क दुकानदाराचा चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्या बहिणीने एका दुकानदाराचा चावा घेतल्याची माहिती मिळत आहे. 

रेखा मोदी असं सुशीलकुमार मोदी यांच्या बहिणीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेखा यांनी एका स्थानिक दुकानदाराकडून दोन पोती तांदूळ विकत घेतला त्यानंतर त्यांनी दुकानदाराला तांदूळ घरी पाठवून देण्यास सांगितलं. मात्र दुकानदाराने तो माल काही घरी आणून दिला नाही. त्यामुळे रेखा यांचा पारा चढला आणि त्या पुन्हा दुकानदाराला त्याचा जाब विचारायला गेल्या.

तांदूळ घरी का आणून दिले नाहीत असा प्रश्न विचारला असता दुकानदाराने त्यांना समाधानकारक उत्तर दिले नाही. यामुळे दुकानदार आणि रेखा यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. जोरदार भांडण झालं. त्याच वेळी संतापलेल्या रेखा यांनी दुकानदाराच्या हाताचा चावा घेतल्याचं म्हटलं जात आहे. पुढे हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेलं. मात्र तिथे देखील रेखा मोदी यांनी गोंधळ घातला. 

पोलीस ठाण्यात जमिनीवर झोपून त्यांनी न्याय देण्याची मागणी केली. शेवटी पोलिसांनी दुकानदाराला रेखा यांचे पैसे परत करण्याचे आदेश दिले आणि हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. रेखा मोदी या सुशीलकुमार मोदी यांची चुलत बहीण आहेत. मात्र रेखा मोदी यांच्यासोबत काहीही संबंध नाही असं सुशीलकुमार मोदी यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

"राहुल आणि सोनिया गांधी यांनी चीनकडून पैसे घेतले", भाजपा अध्यक्षांचा हल्लाबोल

Bihar Flood : नि:शब्द! बिहारला पुराचा तडाखा, मन हेलावून टाकणारा फोटो व्हायरल

"काँग्रेसच्या 100 नाराज नेत्यांनी सोनियांना पाठवलेलं पत्र, केली होती 'ही' मागणी"

...म्हणून रोहित पवारांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार

Video - कडक सॅल्यूट! 16 तास पाण्यात अडकलेल्या तरुणाची वायुदलाने अशी केली सुखरुप सुटका

CoronaVirus News : कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरस आला! संक्रमणाचा धोका दहापटीने वाढला

Web Title: bihar deputy cm sushil modi sister makes ruckus for two sacks of rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.