बिहार: दारू न पिताच अनेकांना बसली 'किक'

By admin | Published: April 7, 2016 11:22 AM2016-04-07T11:22:21+5:302016-04-07T11:27:31+5:30

संपूर्ण बिहारमध्ये दारूबंदी लागू झाल्याने दारूअभावी अनेक नागरिक कासावीस झाले.

Bihar: Do not drink alcohol, many people sit 'kick' | बिहार: दारू न पिताच अनेकांना बसली 'किक'

बिहार: दारू न पिताच अनेकांना बसली 'किक'

Next
>ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. ७ - मुख्यमंत्री नीतिशकुमार यांच्या घोषणेनुसार संपूर्ण बिहार राज्यात या महिन्यापासून दारूबंदी लागू झाली असून, दारूअभावी अनेक जण कासावीस झाले आहेत. रोज दारू प्यायची सवय असलेल्या नागरिकांना दारू न मिळाल्यामुळे त्रास होत त्यांचे अनेक किस्से समोर येऊ लागले आहेत. अनेकांच्या शरीराला कंप सुटला तर काहीजण बेशुद्धही पडले. ७५०हून अधिक नागरिकांना दारूअभावी त्रास होत असून अनेक लोक तर आपल्या कुटुंबियांनाही ओळखू शकले नाहीत. दारूअभावी काही जण आजारीही पडले असून, त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करावे लागले. या नागरिकांना दारूची एवढी सवय झाली आहे की एका व्यक्तीने तर नशा मिळवण्यासाठी चक्क साबणाची वडीच खाल्ली. 
राज्यात १ एप्रिलपासून दारूबंदी लागू करण्यात आली, त्यानंतर अवघ्या ४-५ दिवसांत लोक दारूअभावी आजारी पडू लागले, विक्षिप्त वर्तन करू लागले. बुधवारी राज्यातील ३८ व्यसनमुक्ती केंद्रामध्ये तब्बल ७४९ रुग्णांना दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या नशाबाजांमध्ये एका पोलिस कर्मचा-याचाही समावेश आहे. 
या दारूबंदीचा एका व्यक्तील तर एवढा फटका बसला की तो आपल्या कुटुंबियांनाही ओळखू शकला नाही. सुमारे ३० वर्षांचा हा इसम ३१ मार्चपर्यंत दररोज ६००-१२०० मिलीलीटर देशी दारू पित असे, मात्र १ तारखेपासून दारूबंदी लागू झाल्यामुळे दारूअभावी त्याची प्रकृती बिघडली. 
 

Web Title: Bihar: Do not drink alcohol, many people sit 'kick'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.