Bihar Assembly Election Results : "महाआघाडीला पचणार नाही एक्झिट पोलच्या विजयाचा लाडू, एनडीएचे सरकार बनणार"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 09:10 AM2020-11-10T09:10:40+5:302020-11-10T09:21:31+5:30

Bihar Assembly Election Results : बहुतांश एक्झिट पोलमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वातील महाआघाडीकडे कौल दिसत आहे. मात्र, निकाल राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बाजूने लागेल असा भाजपाला विश्वास आहे. 

bihar election 2020 shahnawaz hussain said nda government in bihar will be formed again under nitish kumar | Bihar Assembly Election Results : "महाआघाडीला पचणार नाही एक्झिट पोलच्या विजयाचा लाडू, एनडीएचे सरकार बनणार"

Bihar Assembly Election Results : "महाआघाडीला पचणार नाही एक्झिट पोलच्या विजयाचा लाडू, एनडीएचे सरकार बनणार"

googlenewsNext
ठळक मुद्देसर्वच एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादव यांच्या महाआघाडीला कौल देण्यात आला आहे. त्यामुळे मतमोजणीत कोण बाजी मारणार, हे पाहण्याचे ठरणार आहे.

नवी दिल्ली / पटना :  बिहार विधानसभा निवडणुकीच्या अंतिम फेरीच्या मतदानानंतर जाहीर झालेल्या बहुतांश एक्झिट पोलमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वातील महाआघाडीकडे कौल दिसत आहे. मात्र, निकाल राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बाजूने लागेल असा भाजपाला विश्वास आहे. 

भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी सोमवारी मतमोजणीच्या एक दिवस आधी दावा केला की, बिहारमध्ये एनडीए सरकार प्रचंड बहुमताने बनणार आहे आणि नितीशकुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारतील. त्यांनी एक निवेदन जारी केले की, "बिहारमधील तीन टप्प्यांच्या निवडणुका संपल्यानंतर एक गोष्ट निश्चित आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि मोठ्या संख्येने मतदारांनी एनडीएच्या बाजूने मतदान केले आहे."

बिहार एक्झिट पोलमधील अंदाज फेटाळत शाहनवाज हुसैन यांनी निकाल एनडीएच्या बाजूने असेल, असा दावा केला आहे. ते म्हणाले, " १० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत बिहारमध्ये जबरदस्त बहुमताने एनडीए सरकार स्थापन होणार आहे आणि नितीशकुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार पाहतील." याचबरोबर, २०१५ च्या बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलचा संदर्भ देत त्यावेळी जनता दल संयुक्त एनडीएचा भाग नसताना बहुतेक अंदाजांमध्ये भाजपा सरकार स्थापन केल्याचा दावा करण्यात आला होता. त्यावेळी एक्झिट पोल चुकीचे ठरले होते. याशिवाय इतर बर्‍याच प्रसंगी एक्झिट पोलमध्ये केलेले अंदाज चुकीचे असल्याचे सिद्ध झाले आहेत, असे हुसैन म्हणाले. 

एक्झिट पोलच्या आधारे महाआघाडीद्वारे लाडू बनवण्याच्या दाव्यावर हुसैन म्हणाले की, अजून काहीवेळ महाआघाडीचे लोक लाडू खातील. निकालानंतर ते लाडू पचवणार नाहीत. बिहारची जनता कधीही महाआघाडीला पचवणार नाही. आरजेडीचा कारभार सर्वांनी पाहिला आहे. तसेच, हुसैन यांनी दावा केला की, 'या आकलनाच्या आधारे आम्ही असे म्हणू शकतो की, महाआघाडीसाठी एक्झिट पोलचा निकाल दोन दिवसांचा आनंद आहे. वास्तविक निकाल दहा तारखेला येतील तेव्हा एनडीए सरकार बिहारमध्ये प्रचंड बहुमताने परत येईल आणि नितीशकुमार बिहारच्या हितासाठी पुढील पाच वर्ष सुशासन आणि विकासाचे राज्य स्थापन करतील.

नितीशकुमार की तेजस्वी, कोण बाजी मारणार?
बिहार विधानसभा निवडणूक निकालाची मतमोजणी सुरू झाली आहे. तमाम मतदानोत्तर जनमत चाचण्यांनी राष्ट्रीय जनता दलाचे युवा नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला दिलेले झुकते माप आणि तरुणांमध्ये तेजस्वी यांच्याविषयी असलेले आकर्षण या पार्श्वभूमीवर बिहारच्या मुख्यमंत्रिपदी तेजस्वी यांना पसंती दिली जाते की, मतदार नितीशकुमार यांना चौथ्यांदा संधी देतात, याचा फैसला आज होणार आहे. बिहारमधील या निकालांबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मतमोजणीची प्रक्रिया सकाळी 8 वाजता सुरू झाली आहे. सर्वच एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादव यांच्या महाआघाडीला कौल देण्यात आला आहे. त्यामुळे मतमोजणीत कोण बाजी मारणार, हे पाहण्याचे ठरणार आहे.

Web Title: bihar election 2020 shahnawaz hussain said nda government in bihar will be formed again under nitish kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.