Bihar Election 2020 : निवडणुकीच्या प्रचारसभेत तेजस्वी यादव यांच्यावर फेकण्यात आल्या चपला, Video जोरदार व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 10:38 AM2020-10-21T10:38:10+5:302020-10-21T10:48:42+5:30

Bihar Election 2020 : तेजस्वी यादव उमेदवाराच्या प्रचारसभेसाठी उपस्थित असताना त्यांच्यावर चप्पल फेकण्यात आली. 

Bihar Election 2020 slippers thrown at tejashwi yadav in public meeting | Bihar Election 2020 : निवडणुकीच्या प्रचारसभेत तेजस्वी यादव यांच्यावर फेकण्यात आल्या चपला, Video जोरदार व्हायरल

Bihar Election 2020 : निवडणुकीच्या प्रचारसभेत तेजस्वी यादव यांच्यावर फेकण्यात आल्या चपला, Video जोरदार व्हायरल

googlenewsNext

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Election 2020) प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. नेते मंडळी रॅली आणि प्रचारसभांमधून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. निवडणूक प्रचारा दरम्यान राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्यावर चप्पल फेकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यात तेजस्वी यादव उमेदवाराच्या प्रचारसभेसाठी उपस्थित असताना त्यांच्यावर चप्पल फेकण्यात आली. 

मिळालेल्या माहितीनुसार, तेजस्वी यादव यांच्या या सभेत एका व्यक्तीने त्यांच्या दिशेने चप्पल फेकून मारली. तेजस्वी यादव व्यासपीठावर आपल्या कार्यकर्त्यांशी बोलत होते. त्याचवेळी एकाने त्यांच्या दिशेने चप्पल भिरकावली. ही चप्पल तेजस्वी यादव यांच्या बाजूने गेली. त्यांना ती लागली नाही. पण यानंतर सभेत एकच गोंधळ उडाला. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक चप्पल तेजस्वी यादव यांच्या बाजूने निघून जाते तर दुसरी चप्पल त्यांना लागताना दिसत आहे.

तेजस्वी यादव प्रचारसभेसाठी हजर राहिले होते. तेजस्वी व्यासपीठावर पोहोचताच त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आणि काही वेळातच हा प्रकार घडला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका दिव्यांग व्यक्तीने त्यांच्यावर चप्पल भिरकावली. घटनेनंतर सुरक्षा रक्षकांनी  त्या व्यक्तीला सभेतून बाहेर काढलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. मात्र प्रचारासाठी गेलेल्या एका मंत्र्याला लोकांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे.

निवडणूक प्रचारासाठी आलेल्या मंत्र्यावर संतप्त गावकऱ्यांनी फेकलं शेण, Video व्हायरल

मतं मागण्यासाठी आलेल्या बिहारच्या कामगार संसाधन मंत्र्याला ग्रामस्थांनी घेरल्याची घटना समोर आली आहे. मुर्दाबादच्या घोषणा देत ग्रामस्थांनी मंत्र्याचा निषेध सुरू केला. तसेच जमलेल्या लोकांनी मंत्र्यावर शेण फेकायला सुरुवात केली आणि जोरदार घोषणाबाजी केली आहे. ग्रामस्थांनी केलेला विरोध आणि व्यक्त केलेला संताप पाहून मंत्री आल्या पावली पळून गेले आहेत. सोशल मीडियावर मंत्र्यांवर शेण फेकतानाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लखीसराय विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार आणि बिहार सरकारचे कामगार संसाधन मंत्री विजयकुमार सिन्हा यांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. विजयकुमार सिन्हा हे हलसीच्या तरहारी गावात मतं मागण्यासाठी गेले होते. मात्र गावात प्रवेश करताच सिन्हा यांच्या विरोधात ग्रामस्थांनी घोषणा देण्यास सुरुवात केली.

Web Title: Bihar Election 2020 slippers thrown at tejashwi yadav in public meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.