Bihar Election 2020: गलवान खोऱ्यात, पुलवामा हल्ल्यात तिरंग्यासाठी बिहारचे सुपुत्र शहीद झाले- पंतप्रधान मोदी
By कुणाल गवाणकर | Published: October 23, 2020 01:30 PM2020-10-23T13:30:22+5:302020-10-23T13:32:24+5:30
Bihar Election 2020 PM Narendra Modi: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय सभा सुरू; वातावरण तापलं
पाटणा: गलवान खोऱ्यात बिहारचे जवान शहीद झाले. मात्र त्यांनी भारतमातेची मान झुकू दिली नाही, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमध्ये निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही बिहारच्या जवानांनी बलिदान दिलं. त्यांनी मी शतश: वंदन करतो, असं मोदी पुढे म्हणाले. यावेळी मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली. केंद्रात काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार असताना बिहार मागे पडला . बिहारची १० वर्षे वाया गेली, अशा शब्दांत पंतप्रधानांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
'एनडीए सरकारनं जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवलं. आम्ही सत्तेत आलो तर पुन्हा जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० लागू करू, असं विरोधक म्हणतात आणि वर बिहारमध्ये येऊन इथल्या जनतेकडे मतं मागण्याची हिंमत करतात. हा बिहारमधील जनतेचा अपमान नाही का?', असा सवाल मोदींनी उपस्थित केला. बिहार आपल्या सुपुत्रांना देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर पाठवतो. पण कलम ३७० पुन्हा आणू म्हणून विरोधक त्या सुपुत्रांचा आणि बिहारचा अपमान करतात, असं मोदी म्हणाले.
Sons of Bihar lost their lives in Galwan Valley for the tricolour and ensured Bharat Mata's head is held high. Jawans of Bihar were also martyred in Pulwama attack. I bow my head at their feet and pay respects: PM Modi#BiharElections2020pic.twitter.com/O7Xw2IyY78
— ANI (@ANI) October 23, 2020
कधीकाळी बिहारवर सत्ता गाजवणाऱ्यांची नजर पुन्हा एकदा सरकारवर आहे. पण बिहार कुणामुळे मागे पडला, हे बिहारी जनतेनं विसरू नये. कोणाच्या कार्यकाळात कायदा सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजले. राज्यात भ्रष्टाचार बोकाळला, हे बिहारच्या जनतेनं लक्षात ठेवावं, असं आवाहन करत मोदींनी राष्ट्रीय जनता दलाला लक्ष केलं. यावेळी मोदींनी बिहार सरकार आणि जनतेनं कोरोनाविरुद्ध दिलेल्या लढ्याचं कौतुक केलं.
I want to congratulate the people of Bihar for the way they are fighting the battle against #COVID19. The decisions & steps taken by the state govt & people of Bihar against the pandemic are highly commendable: PM Modi at a public rally at Biada Maidan in Sasaram. #BiharElectionspic.twitter.com/EjGYY6MIAG
— ANI (@ANI) October 23, 2020
मोदींनी त्यांच्या भाषणात दिवंगत माजी केंद्रीय मंत्री राम विलास पासवान आणि रघुवंश प्रसाद सिंह यांना आदरांजली वाहिली. 'बिहारनं आपले दोन सुपुत्र गमावले. राम विलास पासवान यांना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. ते शेवटच्या श्वासापर्यंत माझ्यासोबत होते. त्यांनी संपूर्ण आयुष्य गरीब आणि दलितांसाठी खर्ची घातलं. रघुवंश प्रसाद सिंह यांनीही आयुष्यभर गरिबांसाठी काम केलं. त्यांनाही मी श्रद्धांजली वाहतो,' अशा शब्दांत मोदींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.