बिहारमध्ये खासदाराच्या वाहनाने पाच जणांना चिरडले, तिघांचा मृत्यू तर दोघांची प्रकृती चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 01:23 AM2017-08-22T01:23:08+5:302017-08-22T01:23:13+5:30

बिहारमधील काँग्रेसच्या खासदार श्रीमती रणजीत रंजन यांच्या ताफ्यातील वाहनाने सोमवारी रस्त्यावरून जाणा-या पाच जणांना चिरडले. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाले आहेत.

In Bihar, five people were killed by the MP's car, three died and two were critical | बिहारमध्ये खासदाराच्या वाहनाने पाच जणांना चिरडले, तिघांचा मृत्यू तर दोघांची प्रकृती चिंताजनक

बिहारमध्ये खासदाराच्या वाहनाने पाच जणांना चिरडले, तिघांचा मृत्यू तर दोघांची प्रकृती चिंताजनक

Next

पाटणा : बिहारमधील काँग्रेसच्या खासदार श्रीमती रणजीत रंजन यांच्या ताफ्यातील वाहनाने सोमवारी रस्त्यावरून जाणा-या पाच जणांना चिरडले. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाले आहेत.
जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्या दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे. बिहारच्या सुपोलमधील निर्मली-सिकरहाटा मार्गावर हा अपघात झाला. त्या वेळी निर्मली शहर काँग्रेसचे अध्यक्ष रामप्रकाश यादवही खा. रंजन यांच्यासोबत होते. खा. रणजीत रंजन या काँग्रेसच्या खासदार असल्या तरी त्यांचे पती पप्पू यादव हे जन अधिकारी पक्षाचे नेते आहेत. पप्पू यादव यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. त्यांचा राष्ट्रीय जनता दलाशी संबंध होता आणि काही काळ ते भाजपाशीही संबंधित होते.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून खासदार रंजन आपल्या हार्ले डेव्हिडसन बाइकवरून संसदेत गेल्या होत्या. संसद भवनाच्या मुख्य दाराशी सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवले होते. निळ्या रंगाचा सुट, डोक्यावर हेल्मेट आणि डोळ्यावर गॉगल अशा वेशात त्या बाइकवरून गेल्यामुळे त्यांना रक्षकांनी ओळखलेच नव्हते. संसदेत बाइक नेण्यास परवानगीही नाही. मात्र लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी संमती दिल्यानंतर त्यांना बाइकसह आत जाण्यास परवानगी देण्यात आली.
आपण बाइकच नव्हे, तर अनेकदा सायकलही चालवतो, असे खा. रंजन अभिमानाने सांगतात. आपल्या आई-वडिलांनी आपल्यावर कधीच कोणतीही बंधने आणली नाहीत, असाही त्या उल्लेख करतात.

Web Title: In Bihar, five people were killed by the MP's car, three died and two were critical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.