पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये हिंसक चकमक, डझनभर पोलीस जखमी; ग्रामस्थांवर लाठीमार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 09:27 AM2022-02-17T09:27:07+5:302022-02-17T09:28:12+5:30
बिहारच्या गयामध्ये पोलीस मोरहर नदीत रेती घाटाचे सीमांकन करण्यासाठी गेले असता ग्रामस्थांनी दगडफेक केली.
गया :बिहारच्या गयामध्ये पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये हिंसक चकमक झाल्याची घटना घडली आहे. या चकमकीत डझनभर पोलीस जखमी झाले आहेत, तर दुसरीकडे वाळू माफियांच्या समर्थनार्थ बाहेर पडलेल्या लोकांवर पोलिसांनी लाठीचार्जही केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी पुरुषांसह अनेक महिलांनाही अटक केली आहे. एनडीटीव्ही वाहिनीने या घटनेचा एक व्हिडिओही शेअर केला आहे.
हालाँकि @NitishKumar महिला सशक्तिकरण की बात करते हैं लेकिन देखिए कैसे महिला आरोपियों के साथ व्यवहार हो रहा हैं @ndtvindia pic.twitter.com/khpbf2Bf7n
— manish (@manishndtv) February 17, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, गयाच्या मुख्य पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहतपूर गावातील मोरहर नदीत रेती घाटाचे सीमांकन करण्यासाठी गेलेल्या पोलीस प्रशासन दाखल झाले होते. यादरम्यान ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये वाद झाला आणि या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीदरम्यान दगडफेक आणि जाळपोळही करण्यात आली. यात दडझनभर पोलीस कर्मचारी आणि दोन डझनहून अधिक ग्रामस्थ जखमी झाले. सध्या जखमी पोलिसांवर स्थानिक सीएचसीमध्ये उपचार आहेत.
दरम्यान, या हिंसचक चकमकीदरम्यान ग्रामस्थांकडून पोलिसांवर दगडफेक आणि परिसरात जाळपोळ करण्यात आली. यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. घटनेनंतर पोलिसांनी यात सहभागी असलेल्या पुरुष आणि महिलांचे हात बांधून त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिसांनी महिलांना हात बांधून बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत जखमी झालेल्या दोन्ही बाजूंच्या लोकांवर स्थानिक खासगी व सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.