'या' राज्यात आहे सोन्याचं सर्वात मोठं भांडार, पण अजूनही होते देशातील गरिब राज्यांमध्ये गणना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 10:20 AM2021-08-08T10:20:54+5:302021-08-08T10:26:43+5:30
Largest Deposit Of Gold Ore: नॅशनल मिनरल इंवेटरी डेटानुसार देशात 501.83 मिलियन टन सोनं असून, यातील 222.8 मिलियन टन एकाच राज्यात आहे.
इंग्रजांच्या काळात भारताला 'सोने की चिडीया' असं म्हणायचे. भारतात अनेक ठिकाणी पूर्नी सोन्याच्या मोठ-मोठ्या खाणी होत्या. पण, आधी इंग्रजांनी आणि नंतर उद्योजकांनी जमिनीतील सोनं हळुहळू काढण्यास सुरुवात केली. पण, आजही भारतात असं एक राज्य आहे, ज्या ठिकाणी सोन्याचं मोठं भांडार आहे. पण, ते राज्य आर्थिकदृष्या अजूनही मागास आहे.
तुम्हाला ऐकून विश्वास बसणार नाही, पण देशातील सर्वात मोठं सोन्याचं भांडार बिहार(Bihar)मध्ये आहे. बिहारच्या गया, राजगीर आणि जमुईमध्ये हो सोनं आहे. एकूण देशाचा विचार केला तर एकट्या बिहारमध्ये देशातील 42 टक्के सोनं आहे. बिहारनंतर कर्नाटक, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि झारखंडमध्ये सोन्याचे भांडार आहेत. पण, बिहारमधील सोन्याचं उत्खनन इतर राज्यांप्रमाणे होऊ शकलं नाही. इतकं मोठं सोन्याचं भांडार असूनही बिहारची गणना देशातील गरिब राज्यांमध्ये होते.
केंद्रीय मंत्री प्रह्लाद जोशींनी राज्यसभेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की, नॅशनल मिनरल इंवेटरी डेटानुसार, देशात 501.83 मिलियन टन सोनं आहे. यातील एकट्या बिहारमध्ये 222.8 मिलियन टन सोनं आहे. त्यानंतर कर्नाटकमध्ये 103 मिलियन टन सोन्याचं भांडार आहे. याशिवाय, पश्चिम बंगालमध्ये 3, आंध्र प्रदेशात 3 आणि झारखंडमध्ये 2 टक्के सोनं आहे.