बिहारमध्ये मदरशाजवळ जबरदस्त स्फोट, क्षणार्धात इमारत झाली जमिनदोस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 13:02 IST2021-06-08T13:01:46+5:302021-06-08T13:02:30+5:30
Explosion in Banka: एका मदरशामध्ये जबरदस्त स्फोट झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की त्याच्या तीव्रतेने मदरशाची संपूर्ण इमारत जमिनदोस्त झाली.

बिहारमध्ये मदरशाजवळ जबरदस्त स्फोट, क्षणार्धात इमारत झाली जमिनदोस्त
पाटणा - बिहारमधील बांका येथे एका मदरशामध्ये जबरदस्त स्फोट झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की त्याच्या तीव्रतेने मदरशाची संपूर्ण इमारत जमिनदोस्त झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आतापर्यंत स्फोटाचे नेमके कारण समजू शकलेले नाही. स्फोटाबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत, मात्र पोलिसांनी अद्याप कुठल्याही दाव्याला दुजोरा दिलेला नाही. (In Bihar, a huge explosion took place near a madrassa, the building collapsed in an instant)
मिळालेल्या माहितीनसार बांका येथील नवटोलिया पोलीस ठाणे क्षेत्रामध्ये एका मदरशाजवळ मंगळवारी सकाळी जबरदस्त स्फोट झाला. या स्फोटामुळे मदरसा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. याबाबत एसडीपीओ डी.सी. श्रीवास्तव यांनी सांगितले की, बॉम्बस्फोट किंवा गॅस सिलेंडरच्या स्फोटात घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. याचा तपास केला जात आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली आहे. तर पोलिसांकडून या स्फोटाचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.