बिहारमध्ये दारुबंदीनंतर गुन्ह्यात वाढ

By Admin | Published: January 12, 2017 03:18 PM2017-01-12T15:18:18+5:302017-01-12T15:18:18+5:30

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एप्रिल 2016 मध्ये दारुबंदीची घोषणा केली. दारुबंदीच्या तीस दिवसानंतर राज्यातील 27 टक्के गुन्हेगारीला आळा बसल्याचे मुख्यमंत्र्यानी सांगितले होते.

In Bihar, the increase in crime after the liquor ban | बिहारमध्ये दारुबंदीनंतर गुन्ह्यात वाढ

बिहारमध्ये दारुबंदीनंतर गुन्ह्यात वाढ

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 12 - मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एप्रिल 2016 मध्ये दारुबंदीची घोषणा केली. दारुबंदीच्या तीस दिवसानंतर राज्यातील 27 टक्के गुन्हेगारीला आळा बसल्याचे मुख्यमंत्र्यानी सांगितले होते. सध्या मिळालेल्या माहितीनुसार बिहारमधिल दारुबंदीनंतर राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. इंडिया सेप्डंच्या अहवालानुसार राज्यातील गुन्हेगारीमध्ये 13 टक्केनी वाढ झाली आहे. बिहार पोलीसांच्या डेटा नुसार न्यायालयात न गेलेल्या गुन्ह्यातही वाढ झाली आहे. एप्रिल - ऑक्टोबर 2016 मध्ये 14, 279 तर ऑक्टोबर2016 ते आजपर्यंत 16,153 गुन्ह्याची नोंद झाली आहे. 
 
2015 मध्ये बिहारमध्ये झालेल्या निवडणुकीत दारुबंदीच्या मुद्द्यावर नितिश कुमार यांनी निवडणुक लढवत अनेक महिला मतदारांना मत देण्याचे आव्हान केलं होतं. दरम्यान,  एक ऑगस्ट रोजी बिहार विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात दारुबंदी विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यात दारुबंदी लागू करण्यात आली. दारुबंदीच्या निर्णयानंतर नितीश कुमार यांच्यावर सर्वच स्तरावरुन कौतुकाचा वर्षाव झाला होता. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दारुबंदीवरुन नितिश कुमारांचे कौतुक केले होते. 
 

Web Title: In Bihar, the increase in crime after the liquor ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.