Jitan Ram Manjhi : 'बिहार मोठे राज्य, बलात्कारासारख्या घटना घडत राहतात'; जीतनराम मांझी यांचे वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 11:41 AM2022-09-14T11:41:10+5:302022-09-14T11:42:00+5:30

Jitan Ram Manjhi : नितीश कुमार सरकारला बदनाम करण्याचा हा विरोधकांचा डाव असू शकतो, असे जीतनराम मांझी म्हणाले.

bihar is a big state rape like incidents keep happening controversial statement of jitan ram manjhi | Jitan Ram Manjhi : 'बिहार मोठे राज्य, बलात्कारासारख्या घटना घडत राहतात'; जीतनराम मांझी यांचे वादग्रस्त विधान

Jitan Ram Manjhi : 'बिहार मोठे राज्य, बलात्कारासारख्या घटना घडत राहतात'; जीतनराम मांझी यांचे वादग्रस्त विधान

googlenewsNext

वैशाली : बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. बिहार हे मोठे राज्य आहे. बलात्कारासारख्या घटना होत असतात, असे विधान माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे (एचएएम) अध्यक्ष जीतनराम मांझी यांनी केले आहे.  दोन दिवसांपूर्वी वैशाली जिल्ह्यातील जांदा येथे सामूहिक बलात्काराची घटना समोर आली होती. आरोपींनी या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. या घटनेनंतर पोलीस-प्रशासन काय कारवाई करते, हा प्रश्न आहे. दरम्यान, जीतनराम मांझी यांच्या या विधानावरून सध्या गदारोळ होण्याची शक्यता आहे.

या घटनेसंदर्भात पोलिसांनी कारवाई केली आहे. लवकरच आरोपी पकडले जातील. नितीश कुमार सरकारला बदनाम करण्याचा हा विरोधकांचा डाव असू शकतो, असे जीतनराम मांझी म्हणाले. विरोधकांच्या आरोपांबाबत जीतनराम मांझी यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "काहीही बोलता येते. बिहारमध्ये एक-दोन कोटी लोक राहत नाहीत. बिहारची लोकसंख्या 12 कोटी आहे. येथे बलात्कारासारख्या घटना घडत असतात. अशा परिस्थितीत सरकारने या घटनेवर काय कारवाई केली, हे पाहावे लागेल. सरकारने आरोपींना पकडण्यासाठी तत्काळ कारवाई करून त्यांच्यावर छापे टाकल्याचे तुम्ही पाहिले असेल. विरोधकांचा सरकारला बदनाम करण्याचा डावही असू शकतो." 

वैशालीमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर भाजपकडून नितीश कुमार सरकारवर हल्लाबोल करण्यात येत आहे. भाजपने सरकारला जंगलराज आणि गुंडाराज म्हटले आहे. एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांनी सामूहिक बलात्कार केला. चार दिवस उलटून गेले तरी पोलिसांना आरोपी सापडले नाहीत. दरम्यान, जीतनराम मांझी यांनी वादग्रस्त विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही ते आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले आहेत. मी भगवान रामाला मानत नाही, असे ते म्हणाले होते. स्वतःला माता शबरीचे वंशज असल्याचे सांगून त्यांनी भगवान रामाचे वर्णन एक काल्पनिक पात्र असल्याचे सांगितले होते. तसेच, मी वाल्मिकींवर विश्वास ठेवतो, तुलसीदासांवर नाही, असेही ते म्हणाले होते.

Web Title: bihar is a big state rape like incidents keep happening controversial statement of jitan ram manjhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.