बापरे! तरुणीच्या पोटात होता तब्बल 7 किलो केसांचा गोळा, डॉक्टरही झाले हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 11:25 AM2020-09-03T11:25:32+5:302020-09-03T11:36:17+5:30
पोटात दुखत असल्यामुळे तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ऑपरेशन केले असता तिच्या पोटात केसांचा गोळा पाहून डॉक्टरांना धक्काच बसला.
बोकारो - झारखंडच्या बोकारो जिल्ह्यात एक अजब घटना समोर आली आहे. 17 वर्षीय तरुणीच्या पोटातून तब्बल 7 किलो केसांचा गोळा काढण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ऑपरेशननंतर डॉक्टरही हैराण झाले आहेत. पोटात दुखत असल्यामुळे तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ऑपरेशन केले असता तिच्या पोटात केसांचा गोळा पाहून डॉक्टरांना धक्काच बसला.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलीला लहानपणापासून केस खाण्याची सवय होती. मात्र साधारण पाच वर्षांपासून तिने तिची ही वाईट सवय सोडली होती. केस खाणं बंद केलं होतं. मात्र तोपर्यंत तिच्या पोटात केसांचा गोळा तयार झाला होता. तसेच तरुणीला उलटी आणि गॅसचा त्रास सुरू झाला. पोटात दुखत असल्याने तरुणी जेव्हा डॉक्टरांकडे गेली तेव्हा त्यांनी तिचं अल्ट्रासाऊंड केलं. त्यामध्ये ट्यूमर सारखी एक गोष्ट पोटात असल्याचं आढळलं.
कौतुकास्पद! मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्याने केले हातावर वार पण 'ती' मागे हटली नाही, Video सोशल मीडियावर जोरदार व्हायरलhttps://t.co/KTMMePpNoJ#crime#Police
— Lokmat (@MiLOKMAT) September 2, 2020
उपचारासाठी तरुणीला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोटदुखीचा त्रास कमी करण्यासाठी तरुणीचं ऑपरेशन करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. त्यावेळी तिच्या पोटात त्यांना तब्बल सात किलो वजनाचा केसांचा गोळा आढळून आला. हे पाहून सुरुवातीला डॉक्टरांना देखील धक्काच बसला. ऑपरेशननंतर तरुणीची प्रकृती बरी असल्याची माहिती आता डॉक्टरांनी दिली आहे.
पोटामध्ये केसाचा गोळा तयार झाल्याने तरुणीचं वजन देखील वाढल होतं. तसेच आरोग्याशी संबंधीत अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. लहानपणी असलेली केस खाण्याची सवय तरुणीच्या जीवावर बेतू शकली असती. मात्र योग्य वेळी उपचार झाल्याने हा धोका टळल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. ऑपरेशन यशस्वी झालं असून लवकरच तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : लक्षणं नसलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये व्हायरसचे प्रमाण जास्त, वेळीच व्हा सावधhttps://t.co/xFtirx0JvC#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia
— Lokmat (@MiLOKMAT) September 2, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : नवा उच्चांक! गेल्या 24 तासांत तब्बल 83,883 नवे रुग्ण, 38 लाखांचा टप्पा केला पार
"सुशांतच्या मृत्यूचे राजकारण करण्याचे पाप भाजपाला महागात पडेल"
"केंद्र सरकार 'हा' निर्णय एकट्याने घेऊ शकत नाही", ममता बॅनर्जींचा हल्लाबोल
"मोदींच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेली संकटं", 'या' सहा मुद्दांवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल