२१ वर्षीय तरुणानं ४ मुलांच्या आईशी केलं लग्न; अजब प्रेमाची चर्चा जिल्ह्यात पसरली, गावकरीही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 02:02 PM2021-08-20T14:02:50+5:302021-08-20T14:03:05+5:30

सरपंचासमोर गावकऱ्यांनी महिला आणि मुलाच्या प्रकरणावर विचारलं असता. मुलाने सगळ्यांच्या समोर महिलेच्या माथ्यावर सिंदूर लावलं.

Bihar khagariya 21 year old boy married with 4 children's mother in front of sarpanch | २१ वर्षीय तरुणानं ४ मुलांच्या आईशी केलं लग्न; अजब प्रेमाची चर्चा जिल्ह्यात पसरली, गावकरीही हैराण

२१ वर्षीय तरुणानं ४ मुलांच्या आईशी केलं लग्न; अजब प्रेमाची चर्चा जिल्ह्यात पसरली, गावकरीही हैराण

googlenewsNext

बिहारच्या खगाडिया येथे लग्नाचा एक अनोखा प्रकार उघडकीस आला आहे. २१ वर्षाच्या मुलाने चार मुलं असणाऱ्या महिलेसोबत लग्न करून सर्वांना धक्का दिला आहे. जोडावरपूर पंचायत येथे राहणाऱ्या २१ वर्षीय मुलाचं मागील २ वर्षापासून ४ मुलांची आई असलेल्या महिलेसोबत प्रेम प्रकरण सुरु होते. ४१ वर्षीय ही महिला नायगावच्या पंचखट्टी येथे राहणारी आहे. शनिवारी गावातील लोकांनी भेलवा पंचायतीच्या सरपंचाला महिलेच्या घरी बोलावलं होतं.

सरपंचासमोर गावकऱ्यांनी महिला आणि मुलाच्या प्रकरणावर विचारलं असता. मुलाने सगळ्यांच्या समोर महिलेच्या माथ्यावर सिंदूर लावलं. मुलाने सर्वांसमोर केलेले कृत्य पाहून सगळे हैराण झाले. त्यानंतर पंचांनी दोघांच्या लग्नाला मान्यता दिली. मिळालेल्या माहितीनुसार, मुलगा आणि महिला दोघंही वेगवेगळ्या जातीतील आहेत. परंतु या अनोख्या लग्नाची चर्चा गावासोबतच जिल्ह्यात पसरली.

४ मुलांच्या आईसोबत लग्न

माहितीनुसार, या महिलेचा पती नाही. तिच्या पतीचा खूप वर्षापूर्वी मृत्यू झाला आहे. ज्यानंतर तिचं युवकासोबत लव-अफेअर सुरु झालं. आता पंचासमोर दोघांनी लग्न लावल्याने त्यांच्या विवाहाची कागदपत्रे तयार करण्यात आली आहे. ज्यात स्पष्ट लिहिलंय की, दोन मुलं महिलेसोबत राहतील अन् दुसऱ्या २ मुलांनी आजी-आजोबांसोबत राहणं पसंत केले आहे. दोन वेगळ्या जाती आणि दाम्पत्याच्या वयाचा मुद्दा लोकांसाठी चर्चेचा विषय बनला आहे.

विधवा प्रेयसीसोबत मुलाने रचलं लग्न

एकट्या विधवा महिलेसोबत २१ वर्षीय मुलाने लग्न केल्यानं सगळ्यांसाठी हैराण करणारं आहे. ज्यावेळी या दोघांच्या नात्याविषयी गावकऱ्यांना कळालं तेव्हा मुलाने क्षणाचाही विचार न करता महिलेशी लग्न करून बोलणाऱ्यांचा आवाज गप्प केला. मुलाच्या या निर्णयानं महिलेला तिचं कुटुंब मिळालं. परंतु या लग्नामुळे गावकऱ्यांची आणि त्याच्या घरातील लोकांची पंचाईत झाली. काहींनी लग्नाचं कौतुक केले तर काहींनी मुलाच्या निर्णयावर आक्षेप घेतला.

Web Title: Bihar khagariya 21 year old boy married with 4 children's mother in front of sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न