भयंकर! लेकाच्या विरहात आईने जळत्या चितेत घेतली उडी; काळजात चर्र करणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 01:16 PM2023-11-10T13:16:24+5:302023-11-10T13:36:14+5:30

मुलाच्या मृत्यूनंतरचं दु:ख सहन न झाल्याने आईने टोकाचं पाऊल उचललं.

bihar madhepura mother jumped on son funeral emotional sad story | भयंकर! लेकाच्या विरहात आईने जळत्या चितेत घेतली उडी; काळजात चर्र करणारी घटना

भयंकर! लेकाच्या विरहात आईने जळत्या चितेत घेतली उडी; काळजात चर्र करणारी घटना

बिहारमधील मधेपुरा जिल्ह्यातील सिंहेश्वर पोलीस स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलाच्या मृत्यूनंतरचं दु:ख सहन न झाल्याने आईने टोकाचं पाऊल उचललं. लेकाच्याच जळत्या चितेत उडी मारली. मात्र याच दरम्यान गावकऱ्यांनी तत्परता दाखवून महिलेला वाचवलं. पण यामध्ये ती गंभीररित्या भाजली. सुखासन पंचायतीतील शिवदयालपूर येथे ही घटना घडली आहे. 

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिकेंद्र यादव यांचा मुलगा करण याने सोमवारी रात्री गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने मंगळवारी सकाळी एकच खळबळ उडाली. दुपारी मृतदेहावर अंत्यसंस्कार करून सर्वजण परतले. मृतदेह पूर्णपणे जळाण्यापूर्वीच करणची आई घरातून पळून स्मशानभूमीत पोहोचली. काही लोकांनी तिला पळताना पाहिलं आणि तेही तिच्या मागे गेले

महिलेने मुलाची जळत असलेली चिता पाहिली आणि चितेतच उडी घेतली. ग्रामस्थांनी तत्परता दाखवत मोठ्या प्रयत्नाने तिला चितेतून बाहेर काढलं. यानंतर, त्यांनी घाईघाईने तिला उपचारासाठी रुग्णालयात नेलं, जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. महिला 60 टक्क्यांहून अधिक भाजली असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

कोणत्याही आईसाठी तिचं मूल हे जग सोडून जाणं ही फार वाईट गोष्ट आहे. असा धक्का सहन करणं सोपं नाही. या आईला देखील आपल्या मुलापासून लांब राहणं सहन झालं नाही आणि तिने त्याच्या जळत्या चितेत उडी घेतली. या प्रकरणी ग्रामस्थांनी तत्परता दाखवून तिला वाचवलं, मात्र ती गंभीररीत्या भाजली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: bihar madhepura mother jumped on son funeral emotional sad story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.