धक्कादायक! सुनेने केस काळे करण्यासाठी तयार करून ठेवलेले हेअर डाय प्यायल्याने सासूचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 10:26 PM2021-06-14T22:26:37+5:302021-06-14T22:27:09+5:30

यावेळी डॉक्टरांनी तेथे उपस्थित असलेल्या लोकांना, असे केमिकल मुलं आणि वृद्ध लोकांपासून दूर ठेवण्याचे आवाहन केले आहे.

Bihar Mother-in-law dies after drinking hair dye in gopalganj | धक्कादायक! सुनेने केस काळे करण्यासाठी तयार करून ठेवलेले हेअर डाय प्यायल्याने सासूचा मृत्यू

धक्कादायक! सुनेने केस काळे करण्यासाठी तयार करून ठेवलेले हेअर डाय प्यायल्याने सासूचा मृत्यू

Next

गोपालगंज - सुनेने पांढरे केस काळे करण्यासाठी ग्लासमध्ये तयार करून ठेवलेली हेअर डाय वृद्ध सासू पाणी समजून प्यायली. हे हेअर डाय केमिकल पोटाच जाताच त्यांची प्रकृती खालावली आणि त्या बेशुद्ध झाल्या. यानंतर कुटुंबियांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले. येथेच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील मांझा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भैसहीं गावात घडली. लालमती देवी, असे मृत महिलेचे नाव आहे. (Bihar Mother-in-law dies after drinking hair dye in gopalganj)

डाय तयार करून दुसरे काम करण्यासाठी गेली होती सून - 
एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, पोलीस उपनिरीक्षक पंकज चौधरी यांनी सांगितले, की चौकशीदरम्यान संबंधित महिलेच्या कुटुंबियांनी म्हटले आहे, की मृत सासूच्या सुनेने पांढरे केस काळे करण्यासाठी बाजारातून हेअर डाय आणले होते. यानंतर सोमवारी सकाळी ती एका ग्लासमध्ये डाय तयार करून दुसरे काम करण्यासाठी गेली. याच दरम्यान महिलेची सासू लालमती देवी यांनी पाणी प्यायण्यासाठी ग्लास घेतला आणि त्यातील पातळ पदार्थ पाणी समजून घेतला.

प्रेमप्रकरण न संपवल्याने सख्ख्या भावाने १५ वर्षाच्या बहिणीची गळा दाबून केली हत्या 

कुटुंबियांनी सांगितल्यानुसार, लालमती देवी यांना डोळ्यांनी स्पष्ट दिसत नव्हते. यामुळे त्यांना ग्लासमध्ये हेअर डाय असल्याचे समजले नाही. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. यानंतर डॉ.सनाउल मुस्तफा आणि डॉ.रामाकांत यांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. मात्र, शरिरात विष पसरल्याने त्यांचा मृत्यू झाला.

शवविच्छेदन न करताच मतदेह सोपवला - 
महिलेच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कुटुंबियांचा जबाब नोंदवला. केस काळे करण्यासाठी वापले जाणारे डाय प्यायल्याने संबंधित महिलेचा मृत्यू झाल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले. यानंतर शवविच्छेदन न करताच संबंधित महिलेचा मृतदेह कुटुंबीयांकडे अंत्यसंस्काराराठी सोपवण्यात आला. तसेच, यावेळी डॉक्टरांनी तेथे उपस्थित असलेल्या लोकांना, असे केमिकल मुलं आणि वृद्ध लोकांपासून दूर ठेवण्याचे आवाहन केले.
 

Web Title: Bihar Mother-in-law dies after drinking hair dye in gopalganj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.