9 चिमुरड्यांना चिरडणा-या भाजपा नेत्याचं अखेर आत्मसमर्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 07:51 AM2018-02-28T07:51:53+5:302018-02-28T07:51:53+5:30
मद्यधुंद अवस्थेत 9 चिमुरड्यांना चिरडणा-या भाजपा नेत्यानं अखेर पोलिसांपुढे आत्मसमर्पण
पाटणा - बिहारमधील मुझफ्फरपूर येथील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी भाजपा नेता मनोज बैठानं अखेर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. मनोज बैठानं मुझफ्फरपूर येथे आत्मसमर्पण केले आहे. मनोजवर 9 मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप आहे. 24 फेब्रुवारीला मनोज बैठानं मुझफ्फरपूर येथे मद्यधुंद अवस्थेत भरधाव कारनं 9 लहानग्यांना चिरडलं होतं. सीतामढी आणि मुझफ्फरपूरदरम्यान एनएच 77 वर हा भीषण अपघात झाला होता. यामध्ये 9 लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला होता.
9 चिमुरड्यांना चिरडलं
शनिवारी (24 फेब्रुवारी) शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी घरी जाण्याच्या तयारीत होते. यावेळी मनोज बैठाचं त्याच्या बोलेरो कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट शाळेच्या आवारात घुसली. अनपेक्षितपणे भरधाव वेगाने येणा-या बोलेरोखाली 33 विद्यार्थी आले. यामधील गंभीर जखमी झालेल्या नऊ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेनंतर मनोज बैठा हा देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत होता. भारत-नेपाळ सीमेनजिक तो कुठेतरी लपून बसल्याची माहितीदेखील समोर आली होती.
#Muzaffarpur Hit & Run Case: Accused #ManojBaitha admitted at Patna Medical College for treatment of injuries he suffered in the accident, that killed 9 school students, denies driving the vehicle involved in the incident. pic.twitter.com/IBzjEoTmOD
— ANI (@ANI) February 28, 2018
#FLASH: Muzaffarpur hit and run case: Manoj Baitha surrenders. pic.twitter.com/GImhY7dJ1l
— ANI (@ANI) February 28, 2018
Muzaffarpur hit and run case: Manoj Baitha has been shifted to Patna Medical College & Hospital from Sri Krishna Medical College & Hospital for treatment of the injuries he suffered during the accident.
— ANI (@ANI) February 28, 2018
Muzaffarpur Hit & Run Case: Earlier visuals of accused Manoj Baitha (man with red 'gamchha') at Sri Krishna Medical College in #Muzaffarpur. He has surrendered to Police & has been shifted to Patna Medical College for further treatment of injuries he suffered in the accident. pic.twitter.com/AEjL88JomK
— ANI (@ANI) February 28, 2018