खिशात ठेवलेला मोबाईल वाजला, उचलण्यापूर्वीच झाला स्फोट; तरुण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 08:44 PM2024-06-12T20:44:28+5:302024-06-12T20:46:05+5:30
बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे तरुणाच्या खिशातच मोबाईलचा स्फोट झाल्याचे समोर आले आहे.
सध्याच्या काळात मोबाईल प्रत्येकजण वापरतो. रस्त्यावरुन जात असताना मोबाईल प्रत्येकाच्या कानावर लावलेला असतो. सध्या मोबाईलचा अचानक स्फोट होण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. कधी बोलत असताना मोबाईलचा कानाजवळ स्फोट होतो तर कधी खिशात ठेवताना स्फोट होतो. यामुळे लोकांचा जीवही धोक्यात येतो. सध्या असंच एक उदाहरण समोर आलं आहे. बिहार येथील नाथनगर परिसरात राहणाऱ्या तरुणाच्या पँटच्या खिशात ठेवलेला मोबाईल फोन येताच स्फोट झाला. मोबाईलचा स्फोट झाल्याने तरुणाच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे.
बुधवारी बिहार येथील शांती समितीचे सक्रिय सदस्य संजयकुमार यादव यांचा लहान भाऊ जयदेव यादव यांच्या पॅण्टच्या खिशात ठेवलेला मोबाईल फोन येताच मोठा आवाज होऊन स्फोट झाला. काही वेळ जयदेवला काही समजले नाही, पण पायाजवळून रक्त येत असल्याचे पाहून तो चक्कर येऊन खाली पडला. लोकांनी खासगी डॉक्टरांना बोलावून जखमी जयदेवच्या उजव्या पायाला पट्टी लावली.
'खेला होबे'! भाजपाचे ३ खासदार TMC च्या संपर्कात असल्याचा दावा; संख्या २३७ होणार?
या घटनेबाबत संजय यादव यांनी सांगितले की, लहान भाऊ जयदेव अंघोळ करून बाथरूममधून बाहेर आला होता. हाफ पँट घालून त्याने मोबाईल खिशात ठेवला. इतक्यात कोणाचा तरी फोन आला. त्याने खिशात हात टाकताच मोबाईलचा मोठा स्फोट झाला. या घटनेत त्याची संपूर्ण पँट आणि अंडरगारमेंट पूर्णपणे जळाले. त्यांच्या उजव्या मांडीला मोठी जखम झाली होती.
पँटच्या खिशातील मोबाईलचा स्फोट झाला, कानाजवळ स्फोट झाला असता तर मोठी जखम झाली असती, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. आजकाल पाकिस्तान देशाच्या नंबर (+92) वरून सतत बनावट कॉल येत आहेत. कधी पैसे मागतात तर कधी मोबाईल हॅक होतो. अशा नंबरवरून कॉल येतात की कॉलला उत्तर देण्याची भीती वाटते. या मोबाईल स्फोटाच्या घटनेने परिसरात अधिकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.