Bihar News: "तेव्हा तुम्ही सोबत होता अन् आता..." विधानसभेत दिसला नितीश कुमारांचा रौद्रावतार; पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 01:39 PM2022-12-14T13:39:49+5:302022-12-14T13:42:26+5:30
CM Nitish Kumar Slams BJP In Sadan: ''तुम्ही सगळे ड्रामा करताय...तुम्ही गलिच्छ काम करत आहात. हे सहन केले जाणार नाही. या सगळ्यांना बाहेर काढून द्या...''
Bihar Winter Session: बिहारमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यादरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांचे रौद्र रूप पाहायला मिळाले. छपरा येथे बनावट दारुमुळे सात जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण गंभीर आजारी आहेत. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी या मुद्द्यावरून भाजपने (BJP) सभागृहात गदारोळ केला.
मुख्यमंत्र्यांचे रौद्र रुप
भाजपच्या गोंधळादरम्यान सीएम नितीश ताडकन उभे राहिले आणि भाजप आमदारांवर अचानक भडकले. त्यांनी भाजपवर सडकून टीका करत रौद्र रूप दाखवले. जेव्हा तुम्ही आमच्यासोबत होता, तेव्हा तुम्ही दारुबंदीच्या बाजूने होता आणि आता विरोधात. आता काय झाल? तुम्ही सगळे ड्रामा करताय...हे चुकीचं आहे. तुम्ही लोक गलिच्छ काम करत आहात. तुम्ही दारुडे आहात, तुम्ही दारू विकता. हे सहन केले जाणार नाही. या सगळ्यांना बाहेर काढून द्या...,' अशी टीका नितीश कुमार यांनी केली.
#WATCHबिहार के मुख्यमंत्री नीतीश कुमार राज्य विधानसभा में अपना आपा खो बैठे क्योंकि विपक्ष के नेता विजय कुमार सिन्हा ने छपरा में जहरीली शराब से हुई मौतों के मद्देनजर राज्य सरकार के शराब बंदी पर सवाल उठाया। pic.twitter.com/JgI3XBQHMG
— ANI_HindiNews (@AHindinews) December 14, 2022
भाजपचा गोंधळ
बिहार विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मंगळवारपासून सुरू झाले आहे. आज सभागृहाचा दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व भाजप आमदार हातात पोस्टर घेऊन दारुबंदीविरोधात सरकारचा निषेध करत होते. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या रौद्रावतारानंतर भाजप आमदारांनी वेलमध्ये येऊन मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. भाजपने मुख्यमंत्र्यांची भाषा अशोभनीय असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी केली.