Bihar News: नितीश कुमारांची मोठी घोषणा; लवकरच देशव्यापी यात्रेवर जाणार, 'मिशन 2024'ची तयारी...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 01:35 PM2023-01-05T13:35:30+5:302023-01-05T13:53:15+5:30
Bihar News: केंद्रातील मोदी सरकारविरोधात सर्व विरोधकांना एकत्र करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यात्रेवर जाणार आहेत.
पाटणा: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या पर्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारविरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी त्यांनी संपूर्ण देशाची यात्रा करण्याची घोषणा केली आहे. नितीश कुमार सध्या ‘समाधान यात्रे’साठी पश्चिम चंपारणमध्ये आहेत.
Bihar | We're visiting various district in the state to understand the grievances of the people. This will help us solve their problems. Along with that, we're also taking the stock of the work done & the work that further needs to be done: CM Nitish Kumar in Bettiah pic.twitter.com/OzEPhgymrG
— ANI (@ANI) January 5, 2023
आजपासून नितीश कुमार राज्यात 'समाधान यात्रे'वर जात आहेत. याद्वारे ते राज्यातील 18 जिल्ह्यात जाणार आणि आपल्या कामांचा आढावा घेणार. ही यात्रा सुरू करण्यापूर्वी त्यांनी एक मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, आर्थिक अधिवेशनानंतर ते स्वतः देश यात्रेवर निघणार आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की, ही यात्रा 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असेल. या यात्रेत नितीश कुमार देशभरातील अनेक विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटी घेतील.