केजरीवालांच्या सूचनेवर नितीश कुमार जोरात हसले, म्हणाले - काही लोक तर काय-काय बोलत राहतात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 12:25 AM2022-10-28T00:25:01+5:302022-10-28T00:27:54+5:30
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना केजरीवाल यांच्या या विधानासंदर्भात विचारले असता, ते जोरात हसले आणि म्हणाले...
भारतीय चलनी नोटांवर ‘लक्ष्मी आणि गणपती’ यांचा फोटो लावण्यात यावा, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी केली. यानंतर, देशभरात गदारोळ सुरू झाला. केजरीवाल यांच्या या मागणीकडे हिंदू व्होट बँकेचे राजकारण म्हणून पाहिले जात आहे. केजरीवाल म्हणाले, भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधींसोबतच लक्ष्मी आणि गणपतीचा फोटोही असायला हवा. यामुळे, घसरत चाललेली अर्थव्यवस्था सांभाळण्यास मदत होईल.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना केजरीवाल यांच्या या विधानासंदर्भात विचारले असता, ते जोरात हसले आणि म्हणाले, 'काही लोक तर काय-काय बोलत राहतात.' नितीश कुमार यांचया या कृतीतून, त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या या विधानाकडे पार दुर्लक्ष केले आणि त्यावर बोलणे टाळले, असे म्हटले जाऊ शकते. सध्या नितीश कुमार 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे काम करत आहेत.
मात्र, त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमात आतापर्यंत अरविंद केजरीवाल दिसून आलेले नाहीत. तसेच, अरविंद केजरीवाल हे विरोधकांच्या मोर्चात सहभागी होणार नाहीत, असाच अंदाज सध्या क्यक्त केला जात आहे.
#WATCH दिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल के नोटों पर श्री गणेश और लक्ष्मी की तस्वीर वाले बयान पर बिहार के मुख्यमंत्री नीतीश कुमार ने कहा, "कुछ लोग तो क्या-क्या कहते रहते हैं।" pic.twitter.com/WAffI8mHTZ
— ANI_HindiNews (@AHindinews) October 27, 2022
तत्पूर्वी, अरविंद केजरीवाल यांनी इंडोनेशियातील चलनी नोटांचे उदाहरण देत, तेथे मुस्लीम समाजाची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. असे असतानाही तेथील नोटांवर लक्ष्मी आणि गणपतींचा फोटो लावला जातो. जर तेथे असे होऊ शकते, तर भारतात का नाही, असेही म्हटले होते.