बिहारमध्ये केवळ देशी दारूवर बंदी?
By admin | Published: December 4, 2015 10:45 AM2015-12-04T10:45:53+5:302015-12-04T10:48:00+5:30
बिहारमध्ये पुढील वर्षी १ एप्रिलपासून दारूबंदी लागू करण्याची घोषणा झाली असली तरी प्रत्यक्षात ही बंदी फक्त देशी दारूवर लागू होऊ शकते.
Next
>ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. ४ - बिहारमध्ये पुढील वर्षी १ एप्रिलपासून दारूबंदी लागू करण्याची घोषणा झाली असली तरी प्रत्यक्षात ही बंदी फक्त देशी दारूवर लागू होऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यात दारूबंदी लागू केल्यास तब्बल ५ हजार ५०० कोटींचा महसूल कमी होणार असल्याने राज्यात संपूर्ण दारूबंदी लागू न करता फक्त देशा दारूवर बंदी लावण्यात यावी असा सल्ला महसूल विभागाद्वारे देण्यात आला आहे. तसेच राज्यात विदेशी दारूवरील एक्साइज टॅक्स वाढवण्याचा सरकारचा विचार असल्याचे समजत आहे.
बिहारमध्ये पुढील वर्षापासून संपूर्ण दारूबंदी लागू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गेल्या महिन्यात केली होती. या निर्णयामुळे गुजरात, केरळ, मणिपूर व नागालॅण्डनंतर दारूबंदी लागू करणारे बिहार हे देशातील पाचवे राज्य ठरले असते. १ एप्रिल २०१६ पासून ही बंदी लागू होणार होती, मात्र त्यापूर्वीच ही घोषणा हवेत विरण्याची शक्यता असून राज्यात केवळ देशीदारू बंद होईल, मात्र विदेशी दारूवर कोणतीही बंदी न राहता केवळ त्याचे दर वाढण्याची शक्यता आहे.